आज मी खूपच लवकर ऑफिसात आलो होतो. एक महत्वाचा रिपोर्ट कंपनीतर्फे सरकारला पाठवायचा होता. बर्याच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांनी त्यातील वेगवेगळे भाग लिहिलेले होते. त्यामुळे तो सर्व रिपोर्ट अथपासून इतिपर्यंत वाचून त्याच्या सुसूत्रतेची खात्री करणं आवश्यक होतं. त्यासाठी माझं पूर्ण लक्ष तिथे असणं जरूरीचं होतं. नेहमीच्या फोन, इ-मेल्स आणि मिटिंगांच्या दंग्यात ते साध्य झालं नसतं. म्हणूनच आज जरा लवकर येऊन हे काम उरकायचं असं मी ठरवलं होतं.
ऑफिसात आलो, इ-मेल बघून कुठल्या तातडीच्या तर नाहियेत ना याची खात्री करून घेतली. मेल मेसेंजर बंद केला, झक्कास एक मग् भरुन चहा करुन घेतला. ऑफिसात इतक्या लवकर अजून कोणीच आलेलं नव्हतं. सेक्रेटरीच्या टेबलावर एक नोट लिहुन ठेवली, "अतिशय महत्वाचं काम असल्याखेरीज मला डिस्टर्ब करू नकोस!" मी काय करतोय ते तिला माहीती असणारच. तिनेच काल तो रिपोर्ट माझ्या टेबलावर आणून ठेवला होता...
केबिनचा दरवाजा बंद करून माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. गरम चहाचा पहिला घोट घेतला आणि तो रिपोर्ट उघडला....
तीन्-चार तास होऊन गेलेले असतील. अचानक माझ्या टेबलावर वाजणार्या टेलिफोनच्या रिंगने मी भानावर आलो. बघतो तर माझ्याच सेक्रेटरीचा, जेनचा फोन.....
"अगं, मी तुला काही महत्त्वाचं कारण असल्याखेरीज मला फोन करू नको म्हणून मेसेज ठेवला होता ना?" माझ्या स्वरातील त्रासिकपणा तिला जाणवला असावा....
"येस सर, आय नो सर! बट देअर इज अ लेडी ऑन लाईन सेईंग शी हॅज टू टॉक टू यू नाऊ!!"
"समबडी फ्रॉम द गव्हर्नमेंट?"
"नो सर!" आणि मग ती आवाज घरगुती करत म्हणाली, "आय थिंक यू बेटर टेक इट सर!"
तिच्या तारतम्यावर माझा खूप विश्वास असल्याने मी अधिक ताणून धरलं नाही....
"ओके, कनेक्ट द कॉल!"
कॉल कनेक्ट झाल्याचा बीप ऐकु आला...
"हॅलो", मी
"हाय बडी! हाउ आर यू डुइंग? आय फाऊंड यू आउट, डिडंन्ट आय?" स्त्रीचा आवाज, उच्चार अगदी अमेरिकन!!
"हॅलो, हू इज धिस?" अगोदरच वैतागलेला असल्याने माझा आवाज किंचित चढला असावा.....
"डॅम्न यू! डोन्च यू रेकगनाईझ॑ युवर फ्रेंन्डस एनीमोअर, फप्पड?" आवाजात रागाचं आणि उर्मटपणाचं मिश्रण! जणू त्या स्त्रीला आपला आवाज जगात कुणी ओळखला नाही तर तो व्यक्तिगत अपमान वाटत असावा!
आणि त्यामुळेच माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला......
"अलीशिया!!!!!" पलीकडून खळखळून हसण्याचा आवाज! ते हास्य माझ्या परिचयाचं होतं. "अलीशियाच, ही!" माझं स्वगत...
"विसरला नाहीस ना मला?"
"नाही, तुला विसरणं कसं शक्य आहे? पण तुला माझा नंबर कुठून मिळाला इतक्या वर्षांनंतर?"
"मी फिलला कॉन्टॅक्ट केलं होतं" फिल हा आमचा दोस्त! लोकांचे पत्ते-फोन नंबर जमवायचं जवळ जवळ व्यसन असलेला!! माझं आश्चर्य आता संपलं होतं...
"पण आता तू कुठून बोलतेयस? तू टेनेसीत रहातेस ना?" ती ईस्ट कोस्टवर टेनेसीमध्ये कुठेतरी सेटल झाल्याचं मी कुणाकडूनतरी ऐकलं होतं....
"पीपल लाइक मी नेव्हर सेटल!!" पुन्हा तेच खळखळून हसणं, "आत्ता मी सान फ्रान्सिस्कोमधे आहे. व्हॉट अ डॅम्न सिटी!!! देअर इज आयदर अ रेन ऑर अ फॉग!!! क्लाऊडी ऑल द टाईम!!!"
आता मलाही हसू आलं. सान फ्रान्सिस्को आहेच तसं! त्यातून टेनेसीच्या स्वच्छ सूर्यप्रकाशातून आल्यावर तिला ते जास्तच जाणवत असणार!!
"सो, व्हाय डू आय गेट द ऑनर ऑफ रिसिव्हिंग युवर कॉल?" मी विचारलं
"बिकॉज यू नेव्हर कॉल मी! फोनचं बिल भरण्याइतके पैसे मिळतात ना तुला?" पुन्हा एकदा अधिकारवाणीने फायरिंग....
"हो, बिल भरतो कसबसं!" मी शरणागती पत्करली.
"एनीवे, आय नीड टू टॉक टू यू!"
"राईट नाऊ वूई आऽऽर टॉकिंग, ऑन द फोन, अलीशिया!"
"नो, नॉट लाइक धिस! समथिंग इंपॉर्टंट!! आय नीड टू सी यू इन पर्सन!! कम ओव्हर हियर धिस आफ्टरनून! ऍन्ड येस, हॅव द डिनर वुईथ मी!"
"मी सान फ्रान्सिस्को मध्ये नाहिये मॅडम! मी एलए मध्ये आहे. अगदी इतक्या जवळ नाहिये ते की उठलो आणि आलो लगेच!! किमान सहा तास तरी लागतील ड्राईव्ह करायला..."
"आय नो! मला अमेरिकेचा भूगोल शिकण्याची, तोही तुझ्याकडून, मुळीच गरज नाहीये! आय विल मेक द अरेंजमेंटस!! माय असिस्टंट विल कॉल युवर सेक्रेटरी इन हाफ ऍन अवर!!!"
"पण मी आज खुप बिझी आहे, मला हा महत्वाचा रिपोर्ट रिव्ह्यू करायचाय गव्हर्मेंटला पाठवण्यासाठी..." मी माझी अडचण मांडण्याचा प्रयत्न केला. तिच्या दॄष्टीने ती अडचण नव्हतीच!!
"तो रिपोर्ट तुझ्या बरोबर घे आणि प्रवासात वाच!!!"
क्लिक....
फोन बंद झाला.....
तिची ही नेहमीचीच सवय....
तिच्या दॄष्टीने जर संभाषण संपलं असेल तर "बाय" वगैरेचे उपचार न बाळगता फोन ठेवून देणार. जर समोरासमोरचं संभाषण असेल तर सरळ तुमच्याकडे पाठ करुन चालायला लागणार...
मी एक सुस्कारा सोडला. आता यातून सुटका होणं शक्यच नव्हतं. रिपोर्ट बराचसा वाचून संपला होता. फक्त शेवटची ७-८ पानं आणि ऍपेंडिक्सच वाचायचे होते.....
रिपोर्ट बंद करुन माझ्या बॅगमध्ये टाकला. बॉसला आणि माझ्या असिस्टंटसना मी उरलेला दिवस "ऑफ साईट" असल्याची इ-मेल केली. काही तसेच महत्वाचे काम असल्यास मला सेलफोनवर कॉन्टॅक्ट करायची विनंती केली. बायकोला फोन करून मला महत्त्वाच्या कामानिमित्त सान फ्रान्सिस्कोला अचानक जावं लागतंय, तुझ्या लंच टाईममध्ये कॉल करून सविस्तर बोलेन असा मेसेज ठेवला...
इतकं सगळं होईपर्यंत सेक्रेटरीने दारावर नॉक केलंच.....
"युवर ट्रॅव्हल प्लान सर!" तिने मला एक पानाचा प्रिंट-आऊट दिला...
"ड्राईव्ह टू सांता बार्बारा एअरपोर्ट. गो टू द युनायटेड एअरलाईन्स काउंटर्स! देअर विल बी अ पर्सन वेटींग फॉर यू", इतकीच माहिती....
त्याच्याखाली माझ्या सेक्रेटरीने एअरपोर्टला कसं जायचं त्याच्या मॅपक्वेस्टवरून काढलेल्या ड्रायव्हिंग डायरेक्शन्स!!!
तो एका ओळीचा ट्राव्हलिंग प्लान पाहून मी कपाळाला हात लावला. जेनच्या चेहर्यावर हसू उमटलं....
"अ व्हेरी ओल्ड ऍन्ड व्हेरी क्लोझ फ्रेंन्ड, आय सपोझ...." ती विलक्षण मिश्किलपणे म्हणाली....
"व्हाय? व्हाय डू यू से सो?"
"व्हेन शी कॉल्ड ऍन्ड टोल्ड हर नेम, आय इन्फॉर्म्ड हर दॅट यू आर बिझी टुडे ऍन्ड नॉट टू बी डिस्टर्ब्ड! आय ऑफर्ड टू टेक हर मेसेज बट शी रिफ्यूझ्ड!!! ऍन्ड शी सेड......."
"व्हॉट?"
"शी सेड इन अ व्हेरी कमांडिंग व्हॉईस, "आय आएम द वन हू टॉट युवर बॉस व्हॉट टु कॉल मेल ऍन्ड फिमेल जेनिट्ल्स हियर इन अमेरिका!! ही वॉज जस्ट अ बॉय देन!! सो डोन्ट टेल मी दॅट हि इज बिझी, रिंग हिम अप!!!"
मलाही हसू फुटलं. खरीच गोष्ट होती ती.....
"दॅट इज अलीशिया, ऑल राईट!!" मी मान्य केलं.....
"ऍन्ड अबाऊट द जेनिटल्स, आय विल टेल यू दॅट स्टोरी व्हेन आय ऍम बॅक टुमॉरो. टिल देन, डोन्ट ड्रॉ एनी कन्क्लूजन्स युवरसेल्फ!!!" मी जेनला बजावलं...
"आय ऍम लुकिंग फॉरवर्ड टू इट!!!" ती खट्याळपणे उद्गारली....
तिने दिलेला तो कागद हातात धरून मी सांता बार्बारा एअरपोर्टच्या दिशेने ड्राईव्ह करायला सुरवात केली.....
(क्रमशः)
मन हे चंचल असतं. कधी शान्त राहील तर शपथ! सारखे भावनांचे, विचारांचे तरंग उठत असतात. त्यातील काही तरंग शब्दांत पकडण्याचा हा एक क्षीण प्रयत्न!!!
Thursday, December 25, 2008
Saturday, November 15, 2008
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.....
शुक्रवारची रम्य संध्याकाळ! हवेत बेताची थंडी!! पुढे आख्खा वीकांत मोकळा पडलेला.....
मी कामावरची अखेरची पाटी टाकून घरी येतो....
घरच्या वाटेवर ड्रायव्हिंग करत असतांनाही मस्त मराठी गाणी गुणगुणतो, "संथ वाह्ते, कृष्णामाई..." क्या बात है!!
नाहीतर एरवी मला कट करणार्या इतर ड्रायव्हर्सवर भकाराने सुरू होणार्या सशक्त मराठी शब्दांची बौछार चालू असते. (खरं सांगायला लाज कसली, तिच्यायला!!)
घरी येऊन मस्त आंघोळ करून ताजातवाना झालो.....
किचनमधून मस्त वास येतोय, जरा तिथे डोकावलो....
"काय चाललंय?"
"पॅटिस करतेय खिम्याचे!" माझी पहिली बायको सांगते....
तिला तिच्या कार्यात सुयश चिंतून मी माझ्या अभ्यासिकेत आलो. मिनी-फ्रीज उघडला....
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....
असा किती वेळ गेला कोण जाणे...
मी कादंबरीच्या कथानकात पूर्ण बुडालेला!!! दुसर्या बायकोच्या चुंबनांचाही दुसरा अध्याय चाललेला!!!
दूर कुठेतरी फोन वाजला....
मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. कोण बाजीराव असेल तर ठेवेल मेसेज.....
ही एक जाणिवपूर्वक लावून घेतलेली सवय!
माझ्या मुलगा रांगण्याच्या वयाचा असतानाची!!
इथे तो डायपरमध्ये शीशी करून घरभर रांगतोय! ह्याला आता लगेच स्वच्छ केला नाही तर हा पांढरं कारपेट पिवळ्या रंगाने रंगवणार या काळजीत आम्ही!! धावपळ करून नवीन डायपर व इतर साहित्य गोळा करून मी त्याच्यामागे लागलोय!! त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळ्तोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही!!! अशा आणीबाणीच्या प्रसंगी मी गुंतलेला असतांना फोन वाजायचा!! उचलला की पलीकडून कोणतरी मला काहीतरी विकायच्या प्रयत्नात!! असा राग यायचा (पुन्हा ते सशक्त मराठी शब्द!!!). शेवटी निर्णय घेतला की फोन उचलायचाच नाही, लोकांना मेसेज ठेवू देत, आपण नंतर त्यांना उलट कॉल करू!!! माझ्या सगळ्या परिचितांना हे सांगून ठेवलंय!! आता जरी माझ्या भावाने फोन केला तरी "दादा, जरा परत फोन कर" एव्हढंच बोलून तो बिचारा फोन ठेवतो!!
असो!! तर दूरवर फोन वाजला, मी दुर्लक्ष केलं....
काही मिनिटातच बायको (पहिली) खोलीत आली....
गरमागरम पॅटिस आणले असतील म्हणून मी तिच्याकडे आशेनं (आणि सस्मित चेहेर्यानं!!) पाहिलं.....
पण नाही, पॅटिस नव्हते, हातात फोन होता....
माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहून तिने तिच्या या अपराधाबद्दल स्पष्टिकरण दिलं...
"कोणीतरी अनोळखी पण इंडियन माणूस आहे. आवाजावरून वयस्कर वाटतोय, म्हणून कॉल घेतला..."
त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....
"हॅलो?"
"हॅलो, मी अमूकअमूक (माझं नांव) यांच्याशी बोलू शकतो का?" खरोखरच एक वयस्क भारतीय माणसाचा आवाज! बोलणं इंग्रजी पण द्रविडी उच्चारातलं!!
"तोच मी आहे"
"मी *** वैदिक केंद्राच्या वतीने बोलतोय. आम्ही आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम करीत असतो..."
मला आता अंदाज आला. असे बरेच फोनकॉल्स वेळोवेळी येत असतात. बहुतांश आर्थिक मदतीच्या अपेक्षेने. मलाच नाही तर आपल्यालाही येत असतील. आम्ही आपले त्यांची माहिती ऐकून घेतो आणि जर आमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल तर इतर सगळ्यांप्रमाणेच यथाशक्ति मदतही करतो. विशेष काही नाही, आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून!!
"बरं, पुढे बोला.."
"आम्ही आमच्या केंद्रातर्फे गोरक्षण आणि गोसंवर्धनाचे कार्य करत असतो."
आता गोरक्षण हा काही माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय नाही. मला रोगनिवारण, मुलांचे शिक्षण, दरिद्रतानिर्मुलन वगैरे एकंदरित "माणसांचे" रक्षण आणि संवर्धन यात जास्त इंटरेस्ट आहे. पण मनात म्हटलं, मी कोण ठरवणारा? एखाद्याला गोरक्षणातही इंटरेस्ट असू शकतो.
"माफ करा, आपल्याबद्दल मला आदर आहे पण मला काही गोरक्षणाच्या कार्यात फारसा रस नाही" मी सत्य सांगून टाकलं आणि माझ्या कादंबरीकडे वळलो.
"माफ करा सर, पण मी तुम्हाला हे कार्य अतिशय पुण्यवान आणि महत्त्वाचं आहे हे जर चर्चा करुन पटवून दिलं तर तुम्ही त्यात रस घ्याल का?"
म्हातारबुवांच्या या धिटाईचं मला कौतुक वाटलं.
"जरूर! तुम्ही तसं केलंत तर मी जरूर माझं मत बदलीन."
म्हणून मी पुढे विचारलं,
"तुम्ही गोरक्षण आणि गोसंवर्धन करता म्हणजे नक्की काय करता?" मी असा रस दाखवत असलेला बघून म्हातारबुवांनाही हुरूप आला.
"आम्ही गोमातेला खाटिकखान्यात जाऊन कत्तल होण्यापासून वाचवतो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गाय ही देवता आहे. तेंव्हा अशा ह्त्येसाठी चालवलेल्या गाईना आम्ही विकत घेतो आणि आमच्या गोशाळेत ठेवतो."
"तुम्ही मूळचे कुठले? तुमच्या उच्चारांवरून तुम्ही दाक्षिणात्य वाटता..." माझी चांभारचौकशी...
"यास सार, आयम फ्रॉम त्रिचनापल्ली. आय वर्क्ड इन त्रिचनापल्ली तहसील ऑफिस फॉर थर्टीसेवन इयर्स!! आयम नाऊ इन द युएस फॉर लास्ट वन इयर!!"
"इथे कसे काय?"
"माझी मुलगी लग्न होउन इथे असते. मी रिटायर झाल्यापासून आता तिच्याकडेच असतो".
"अमेरिकेत तुमचा वेळ घालवण्यासाठी हे केंद्राचे कार्य करता वाटतं," मी व्रात्यपणे एक गुगली टाकला. खरंतर मी नव्हे, माझ्या पोटात गेलेल्या शिवास रीगलने टाकला.....
"यास स्सार", माझ्या अपेक्षेप्रमाणेच आपण कधी त्रिफळाचीत झालो हे म्हातारबुवांना कळलंही नाही...
"बरं, भारतात कुठे आहे तुमची ही गोशाळा?"
"भारतात नव्हे, इथे अमेरिकेतच व्हर्जिनियामध्ये आहे आमची गोशाळा"
"आँ!!!!" आता त्रिफळाचीत व्हायची माझी पाळी होती....
"भारतातल्या गायींना इथे आणून ठेवता?" काय युएस इमिग्रेशनने गाईंसाठी सुद्धा ग्रीनकार्ड सिस्टीम चालू केलीय की काय!!!! काय सांगता येत नाही, या जॉर्ज बुशच्या अमदानीत काहीही अशक्य नाही!!!!
"भारतातल्या नव्हे सर, आम्ही इथल्या अमेरिकन गाईंनाच सोडवून आमच्या या व्हर्जिनियातल्या गोशाळेत ठेवतो. आत्तापर्यंत एक्काहत्तर गाई बाळ्गल्या आहेत आम्ही...."
आता भारतात काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाल्याने त्यांनी विकलेल्या गाई खाटिकखान्याकडे नेतात हे मला ठाऊक आहे. अशा गाईंना सोडवून त्या परत शेतकर्यांना देणं हे मी एकवेळ समजू शकतो. पण इथल्या अमेरिकेतल्या गलेलठ्ठ गाईंची सोडवणूक? आता मला हा सर्व प्रकार जाम विनोदी वाटायला लागला होता. मी हातातली कादंबरी मिटून बाजूला ठेवली. म्हातारबुवांशी गप्पा मारण्यासाठी ऐसपैस मांडी ठोकून बसलो. इतक्यात बायको परत डोकावली. मी अजून फोनवरच आहे हे पाहून तिने खूण करून "कोण आहे?" असं विचारलं. मी मान हलवली आणि हाताची मूठ करून ओठांना लावुन चिलमीचा खोल झुरका घेतल्याचा अभिनय केला.....
ही आमच्या दोघांमधली गुप्त खूण! जर आम्ही कुणाची फिरकी घेत असलो तर एकमेकांना ते कळवतांना आम्ही "फिरकी" हा शब्द वा खूण वापरत नाही. कारण इथल्या अमराठी लोकांनाही ते कळतं. त्यापेक्षा "ही फुक्कटची चिलीम भेटलीये, जरा चार झुरके मारून घेतो" ही खुण जास्त सेफ!! (आयला! बोलण्याच्या भरात खूण सांगून बसलो की तुम्हाला!!!!)
कपाळावर हात मारत ती परत आत गेली.....
"असं का? एक्काहत्तर गाई पाळल्यात का तुम्ही?" आमचं संभाषण पुढे चालू झालं...
"यास स्सार!"
"अणि बैल? बैल किती पाळलेत तुम्ही?"
"बैल?" म्हातारबुवा गोंधळले, "बैल कशाला पाळायचे?"
"का? बैलांना खाटिकखान्यात कत्तलीसाठी नेत नाहीत?"
"तसं नाही, पण आपल्या धर्मशास्त्रात बैलांना काही महत्त्वाचं स्थान नाहीये", म्हातारबुवा आता स्वतःच्या नकळत हळूहळू सापळ्यात शिरत होते....
"असं कसं आपण म्हणता? आपल्या श्री शंकरदेवतेचं वहान बैलच आहे की! प्रत्येक शिवमंदिरात शंकराच्या पिंडीच्या समोर नंदीची मूर्ती असतेच की!! तुमच्या दक्षिण भारतातल्या मंदिरातही पाहिलीये मी. शिवाय बंगलोर-म्हैसूरला तर नंदीच्या प्रचंड मूर्तींची पुजा-अर्चा होते ना!!"
"पण बैल ठेवण्यात मतलब काय?" आता तेच मला उलट विचारू लागले....
"बाकीचं सोडून द्या! पण तुम्ही ह्या ज्या पूज्य गोमाता वाचवता आहांत आणि पाळता आहांत, त्या गोमाता जन्माला घालण्यामध्ये बैलांचा काहीतरी हातभार आहेच की नाही? उद्या सगळे बैल जर खाटिकखान्यात नेउन कत्तल केले गेले तर तुम्हाला वाचवायला आणि पाळायला नवीन गोमाता मिळणार कुठून?" आता शिवास रीगल भारी म्हणजे भारीच व्रात्य झाली होती....
माझा युक्तिवाद नाकारणं म्हातारबुवांना शक्य झालं नाही. त्यांनी मग मुद्दा बदलला....
"पण सामाजिकद्दृष्ट्या बैलांना गाईइतकं महत्त्व नाहीये.."
"मला नाही पटत! भारतात बैल हा शेतकर्याचा किती मोठा अधार असतो! बैलाशिवाय शेतीची कामं होतील काय?"
"पण इथे अमेरिकेत शेतीसाठी बैल कुठे वापरतात?" म्हातारबुवांनी विजयी स्वरात विचारलं...
"कबूल! इथे यंत्रांनी शेती होते, बैल वापरत नाहीत. पण इथल्या प्राणीसमाजसंस्थेत त्यांचं एक विशिष्ट स्थान आहेच की! 'बुलडोझर' वगैरे शब्द काय उगाच आले का?"
"हं!!" म्हातारबुवा आता विचारात पडले...
"आणि तुम्ही बैलांना तसेच सोडून फक्त गाईंना रक्षण देताय! कायद्याचा सल्ला घेतलाय का तुम्ही लोकांनी? उद्या कोणीतरी तुमच्याविरुद्ध "जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!" मी माझं हसू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत म्हणालो.
"खरंच असं होऊ शकेल?" म्हातारबुवांचा आवाज आता सचिंत झाला होता....
" मग! अमेरिका आहे ही, भारत नव्हे! तुम्ही इथे एक वर्षांपूर्वी आलांत, मी इथे गेली वीस वर्षे रहातोय...." मी खुंटा ठोकून घट्ट केला...
"तुमचे मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत स्सार! मी त्यांचा अजून अभ्यास करीन आणि मग तुम्हाला पुन्हा फोन करून तुमच्याशी चर्चा करीन", म्हातारबुवांनी चर्चेत अखेर हार पत्करली....
"जरूर!! आता मी जेवायला जातो!! काय, येणार का माझ्याबरोबर जेवायला?" मी विचारलं.
"नो, बट थॅन्क्यू!" म्हातारबुवा हसून म्हणाले.
पण मग त्यांनी अगदी नको तो प्रश्न केला.....
"काय आहे आज जेवणाचा मेन्यू?"
"गरमागरम बीफच्या खिम्याचे पॅटिस!!!!!"
मी फोन ठेवला आणि त्या पाताळविजयम् सिनेमातल्या राक्षसासारखा हॅ, हॅ, हॅ, हॅ करून हसलो........

संगणक आणि मराठी साहित्य!
फार फार काळापूर्वीची गोष्ट....
अगदी साठी-सत्तरीच्या दशकातली!
हल्लीच्या तरूण पिढीला अगदी पुराणातल्या भूर्जपत्रावरील वाटावी अशी कथा!!
मराठी तरूण तेंव्हा नुकतेच सीमोल्लंघन करून सातासमुद्रापार जायला सुरवात झाली होती....
नाही म्हणजे, त्यापूर्वीही ते परदेशी शिकायला जात असत. पण ते म्हणजे इंग्लंडला, तांत्रिक शिक्षण असेल तर जर्मनीला. मराठी विद्यार्थ्यांनी कोलंबसाच्या देशात शिक्षणाला जायची सुरुवात प्रामुख्याने साठी-सत्तरीच्या दशकातच सुरू झाली.
आयआयटीतून निघालेले ते बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी तरूण!
सहस्ररश्मी सूर्याप्रमाणे जणू अवघं आकाश पादक्रांत करण्यास निघाले होते....
या नवीन जगात त्यांना सगळंच अपरिचित होतं. तत्कालीन सर्वसामान्य अमेरिकावासीयांना तेंव्हा भारत हा एक शांतताप्रिय पण मागासलेला देश आहे यापेक्षा फारसं अधिक काही माहिती नव्हतं. तेंव्हा मी इंडियन आहे असे सांगितल्यावर प्रश्न यायचा की कोणती जमात? (विच ट्राईब?) संदर्भ अर्थात रेड इंडियन लोकांचा....
त्या तरूणांच्या विद्यापीठांमध्ये जरी अत्युच्च पातळीवरचं शिक्षण दिलं जात होतं पण बहुतांशी पारंपारिक पद्धतीचं होतं. तसे संगणक होते पण ते पंचकार्डवाले किंवा अगदी पुढारलेले म्हणजे २८६, ३८६. "खिडक्या" नव्हत्या. आज्ञावली पाठ करायला लागायच्या (एफ१० = सेव्ह फाईल!). क्रे सुपरकॉम्प्यूटरवर तुम्हाला सीपीयू टाईम मिळणे ही तुमच्या संशोधनासाठी अभिमानाची आणि किंचित गर्वाचीही बाब असे. इ-मेल टेक्स्ट स्वरूपात होती पण भारतातील लोकांकडे ती नसल्याने तिचा मराठी घडामोडी समजून घेण्यासाठी काही उपयोग नव्हता. पाठवलेले पत्र भारतात पोचायला तीन आठवडे आणि दिलेले उत्तर (लगेच दिले असेल तर!) परत मिळायला आणखी तीन आठवडे सहज लागत. त्यामुळे कौटुंबिक खुशाली जरी समजली तरी सामाजिक चर्चा करणे शक्यच नव्हते. फोनही ट्रंक कॉल! एकतर ते परवडत नसत आणि ते भरवशाचेही नसत. कधी लाईन डिस्कनेक्ट होईल याचा नेम नसे...
खिडक्या (विंडोज) आल्या आणि चित्रच बदललं. पेंटियम टेक्नॉलॉजी आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज यामुळे सुशिक्षित पण सामान्य माणसापर्यंत संगणक जाऊन पोहोचला. ए-मेल्समुळे तात्काळ संपर्क साधता येऊ लागला. अटेचमँट पाठवायच्या सोईमुळे विचारांची देवाणघेवाण सुलभ झाली. त्यातच संकेतस्थळे आणि वैयक्तिक ब्लॉग्ज करता येऊ लागले आणि मराठी (आणि जागतीक) साहित्यविश्वात जणू क्रांतीच झाली. आधी आपली माणसे रोमन लिपी वापरून मराठी लिहू लागली. त्यानंतर काही बुद्धिमान मराठी मुलांनी इंग्रजी क्व्रर्टी कळफलक वापरून मराठी लिहिता येईल असे प्रोग्राम्स रचले आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पब्लिक डोमेनमध्ये (विनामोबदला उपलब्ध) ठेवले. मराठी भाषेवर आणि साहित्यावर या मुलांचे अनंत अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे आजवर इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा अरसिक (?) व्यवसायात गुंतलेल्या अनेक मराठी माणसांची प्रतिभा जणू उफाळून आली. तीच गोष्ट संकेतस्थळांच्या मालकांची! पदराला तोशीस सोसून त्यांनी मायबोली, मिसळपाव, उपक्रम, मनोगत यांसारखी संकेतस्थळे चालू ठेवली आहेत. उद्या जर मराठी भाषेचा इतिहास लिहिला गेला तर या दोन गोष्टी देणार्या व्यक्तिंना तिथे मानाचं पान द्यावंच लागेल. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या उक्तीप्रमाणे घरोघरी मराठी माणसे ललित लिखाण करण्याचा प्रयत्न करू लागली. संकेतस्थळांवर जाऊन चर्चा, विचारविनिमय, आणि हो, कधीकधी भांडणेही करू लागली. आणि सर्व गोष्टींचा मराठी साहित्यावर बहुअंगाने परिणाम झाला.
प्रथम म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक मराठी वृत्तपत्रे जालावर उपलब्ध झाली. एकाच एक वर्तमानपत्राची वर्गणी लावून तेच ते वाचण्याची सक्ती संपली. जर तुमच्याकडे जाल असेल आणि वाचनाची ताकद व वेग असेल तर तुम्हाला ८-१० वर्तमानपत्रे रोज वाचण्याची सोय उपलब्ध झाली. लोकसत्ता, मटा, सकाळ या आघाडीच्या दैनिकांबरोबरच लोकमत, पुढारी, गोमांतक वगैरे प्रांतिक (रीजनल) वर्ततमानपत्रे जालावर वाचायला मिळू लागली. त्यातून फायदा हा झाला की अग्रगण्य वृत्तपत्रांचे आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाविषयीचे अज्ञान किती थोर आहे याची वाचकांना जाणीव झाली. महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे नागपूर व औरंगाबाद नव्हे आणि मराठी माणसाचा हुंकार हा तथाकथित आयटी/औद्योगिक उद्द्योगात काम करणार्या माणसाचे मनोगत नव्हे याची जाणीव झाली. विदर्भातल्या आत्महत्या करणार्या शेतकर्याची समस्या किती भीषण आहे ते मुंबई-पुण्यातल्या पोकळ चर्चेपेक्षा (जी चर्चा मानवी जीवांच्या आत्महत्या आणि एका मंत्र्याच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी चाललेल्या कारवाया एकाच मापात मोजते!) किती भिन्न आणि गंभीर आहे ते समजलं.
दुसरे म्हणजे मराठी मनाचा आत्मविश्वास वाढला. मी काहीतरी रुटूखुटू का होईना पण लिहू शकतो. ते लोकांना आवडू शकतं हे समजल्यामुळे अजून लिहिण्याची, वैचारिक असो वा ललित, इच्छा निर्माण झाली. पूर्वी मराठी लिखाण म्हणजे विद्यापीठात हायर मराठी घेतलेल्या विद्वान प्राध्यापकांचे काम! ही आपली लाइन नव्हे हा जो काही न्यूनगंड सायन्स आणि कॉमर्सच्या मुलांमध्ये होता तो नाहीसा झाला. ही मुलं प्रथम आपल्या अभ्यासाच्या विषयावर आणि नंतर (हळूच! गुपचूप!! टोपण नावाखाली!!!) ललित लेखन करुन पाहू लागली. मुळात अतिशय बुद्धिमान असल्याने त्यांनी लिहिलेलं लिखाण कसदार ठरू लागलं. मराठी साहित्याच्या दालनात एक अल्हाददायक, मोकळी हवा खेळू लागली. नवीन ताज्या दमाची जाल-लेखकांची फळी निर्माण झाली. वर्ड प्रोसेसिंगचा आणखी एक फायदा म्हणजे लिखाणात सुधारणा करण्यासाठी लिहिलेले कागद फाडून पुनःपुनः लिहिण्याची सक्ती संपली. वर्ड प्रोसेसरच्या स्क्रीनवर तिथल्यातिथे सुधारणा करता येऊ लागली. कागदी पुस्तक प्रकाशन व्यवसायातही छपाईचे खिळे जुळवण्याची गरज नाहीशी झाली. लिखाण संगणकावरच ऑफसेट करून थेट छपाईला पाठवायची सोय उपलब्ध झाली, प्रकाशनातली गुंतागुंत आणि खर्च कमी झाले.
तिसरे म्हणजे मराठीतील तथाकथित प्रकाशकांची मक्तेदारी संपली. पूर्वी लेखकाला प्रकाशकाच्या नाकदुर्या काढायला लागायच्या. नाही नाही त्या अटी सहन करायला लागायच्या. लोकप्रिय विषयांवरच लिखाण करायचं, समाजाला अप्रिय विषयांवर लिखाण केलं तर ते खपणार नाही म्हणूनच कोणताही प्रकाशक ते प्रकाशित करणार नाही ही भीती गेली. मला जे आवडतं आणि पटतं ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन मग त्याला कोणी वाचक नाही मिळाले तरी बेहत्तर ही एक अत्यंत आवश्यक असलेली कलंदरी लेखकांमध्ये निर्माण झाली. समाजाला न रुचणार्या (उदा. नास्तिकता, आदरणीय व्यक्तींच्या कार्याचे मूल्यमापन, समलिंगी संबंध) लेखनालाही प्रसिद्ध करण्याचं धैर्य लेखकांमध्ये आणि संकेतस्थळांच्या संचालकांमध्ये निर्माण झालं. त्यातून पूर्वापार चालत आलेली " मायबाप रसिक वाचक" ही भूमिका नाहीशी झाली. पूर्वीही ही भूमिका प्रामाणिक नव्हतीच, आपली पुस्तके लोकांनी विकत घेउन वाचावीत, आपण वाचकांच्या "गुड बुक्स" मध्ये असावं यासाठी पूर्वीच्या लेखकांनी आणि प्रकाशकांनी वापरलेली ती एक क्लुप्ती होती. आता मी मला जे पटतं ते लिहीन, जर वाचकांना आवडलं तर वाचकांनी माझ्या साईटवर येऊन ते वाचावं अशी भुमिका काही कलंदर लेखकांनी घेतल्यावर पारंपारिक मराठी वाचक भांबावला, क्षणभर संतापलाही. पण त्याला लगेच जुन्या "मायबाप वाचक!" मधला खोटेपणा कळून आला आणि त्याने आपल्या आवडीच्या लेखकांच्या साईटसचे फेव्हरिट्स बनवले आणि वेळोवेळी तो तिथे चक्कर टाकू लागला. प्रकाशकांची सद्दी संपली. उद्या मराठीचं भवितव्य काय ही जी प्रचलित लेखक-प्रकाशकांकडून ओरड ऐकू येते आहे त्याचे मूळ हे आता आपलं कसं होणार या भवितव्याविषयीच्या चिंतेत आहे. आज अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात यांच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री होते आहे. उद्या त्या लोकांच्याही हाती संगणक आणि आंतरजाल गवसलं की आपलं काय होणार या भीतीतून ही ओरड होते आहे....
चौथे म्हणजे अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही. मराठी मनाशी, महाराष्ट्रातील घटनांशी ज्याला आत्मीयता आहे तो मराठी माणूस ही नवीन व्याख्या रूढ झाली. पूर्वी महाराष्ट्रात रहाणारा पण जेमेतेम एक मराठी वर्तमानपत्र वाचणारा आणि क्वचित एखादे मराठी पुस्तक विकत घेणारा स्थानिक माणूसही अनिवासी मराठी माणसांना सहज हिणवू शकत असे. आता आयटी उद्योगाने बरीच पंचाईत केली आहे. आपण उगाच अनिवासी मराठी लोकांवर टीका करायची आणि आपलीच मुलगी/ मुलगा, भाचे. पुतणे पाश्चात्य देशांत असायचे!! त्यामानाने आमच्या पिढीने खूप सोसलं.!!!! आता ती सोय गेली. एखादा अनिवासी मराठी माणूसही सात-आठ वर्तमानपत्रे रोज वाचून महाराष्ट्रातल्या घटनांशी परिचित असू शकतो. स्थानिक मराठी माणसाप्रेक्षा त्याचे मराठी वाचन अधिक चौफेर असू शकते ही गोष्ट सिद्ध झाली. काही माणसांच्या ही वस्तुस्थिती पचनी पडायला अजून वेळ जातोय पण स्थानिक शहाण्या मराठी माणसांनी ही गोष्ट कधीच मान्य केलीय. भौगोलिक अंतरापेक्षा 'मराठी असणे' ही वृत्ती जास्त महत्त्वाची ठरते आहे. त्यातूनच मराठी साहित्यसंमेलन बे-एरियात भरवण्यासारखे प्रस्ताव पुढे येत आहेत.......
या सर्व बदलांचा भविष्यातील मराठी साहित्यावर काय प्रभाव पडेल? विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे धावत आहे की भविष्याबद्दल कल्पना करणंही कठीण आहे. एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल. छापील साहित्यावर विसंबून रहाणारी आज वयस्कर असलेली पिढी जसजशी काळाच्या पडद्याआड अस्तंगत होत जाईल आणि नवी आंतरजालावर वावरणारी पिढी निर्माण होईल तसतसे कागदावरच्या पुस्तकांचे प्रमाण कमीकमी होत जाईल. थोडक्यात प्रकाशक ही संस्था नामशेष होत जाईल. कागदविहीन साहित्य (पेपरलेस लिटरेचर!) ही नवी संकल्पना रूढ होईल. मराठी माणसांना निरनिराळ्या विषयांवरचे त्यांच्या आवडीचे लिखाण वाचायला मिळेल. मी आता "किर्लोस्करचा' दिवाळी अंक विकत घेतलाय त्यामुळे मला आता त्यातल्या आवडत नसलेल्या कविता आणि लेखही वाचायलाच लागतायत ही अगतिकता संपेल. मराठी मासिकांना जर जगायचे असेल तर त्यांना त्यांच्या अंकांच्या इ-आवॄत्या काढायलाच लागतील. लोकप्रभासारख्या साप्ताहिकांनी ही सुरवात आता केलीच आहे. वाचकांनाही आपल्याला आवडीच्या लेखकांचे नवीन लिखाण त्यांच्या साईटवर जाउन मोफत वाचायची मुभा मिळेल. लेखकांना प्रकाशकाच्या मेहेरबानीवर अवलंबून न राहता त्यांच्या मनातील विषयांवर लिहायची मोकळीक मिळेल. प्रचलित नसलेले अनेक विषय लिखाणात येतील. मराठीची दिवसेंदिवस दुर्दशा होतेय असा जो काही हितसंबंधी लोकांनी चालवलेला धोशा आहे त्यातला फोलपणा उघडकीस येईल. मराठी साहित्यसंमेलने महाराष्ट्राखेरीज अन्यत्रही होऊ लागतील. आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील. मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक सकस व समॄद्ध बनेल. केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर सर्व जगभर पसरलेला समस्त मराठी समाज एकमुखाने गर्जेल!
येळकोट येळकोट, जय मल्हार!
आई अंबाबाईचा, उदो उदो!!
हर हर हर हर महादेऽऽव!!!

स्मरण!
तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही
डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही...
पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी,
तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....
शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही,
अनेक वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही...
संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही
पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही....
एकटं एकटं वाटतं पण, तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......
बाकी खरंऽऽच काही नाही गं......
(फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक....)

Sunday, July 27, 2008
जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३
(पूर्वसूत्रः असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही.... आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता म्हणा!!
आणि मग एकदा ती वेळ आली....... काळरात्रीची भयाण वेळ.........)
आमच्या अंतिम परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. खरं तर परीक्षा दुपारी बारा वाजता होती. आम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन बसलो होतो पण जॉर्जचा पत्ताच नव्हता.......
एक वाजता जॉर्ज उगवला. आमची नाराजी जाणून म्हणाला,
"मला माहीत आहे की मला यायला उशीर झालाय! पण तुम्ही काळजी करु नका. मी तुम्हाला अगदी भरपूर वेळ देणार आहे. असं बघा, मला हा पेपर सोडवायला तीन तास लागतील. आत्ता वाजलाय एक. मी तुम्हाला पाच तास, अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देतो. मग तर झालं समाधान!"
आमचं समाधान व्हायच्याऐवजी पोटात खड्डा पडला. स्वतः जॉर्जला सोडवायलाच तीन तास लागणार म्हणजे तो पेपर किती कठीण असेल!!! प्रश्नपत्रिका वाचल्यावर आमची ती भीती खरी ठरली.....
जॉर्ज प्रश्नपत्रिका वाटून तिथून निघून गेला. पुढले पाच तास आम्ही त्या पेपराशी झुंजत होतो....
आम्ही म्हणजे सर्व इंटरनॅशनल विद्यार्थी!!! अमेरिकन पोरं-पोरी पहिल्या एका तासातच हताश होऊन पेपर फेकून निघून गेली होती......
त्यांनी बहुदा हा पेपर सोडवण्याऐवजी मॉलमध्ये नोकरी करणं पसंत केलं असावं! हो, त्यांच्यापाशी तो ऑप्शन होता! आमच्यापाशी दुर्दैवाने नव्हता....
सहा वाजून गेले तरी जॉर्ज परत आला नव्हता.....
आमचा पेपरही सोडवून पूर्ण झाला नव्हता....
अखेर रात्री आठ वाजता जॉर्ज उगवला....
"आर यू डन?" त्यानं विचारलं. आम्ही नकारार्थी मान डोलावली...
"ओके, मी तुम्हाला अजून अर्धा तास देतो. त्यानंतर तुमचा पेपर माझ्या ऑफिसच्या दाराच्या फटीतून आत सरकवा", राजा उदार झाला आणि अर्धा तास जास्त दिला.....
पण इथे सात तास झुंजून आमचे मेंदू इतके थकले होते की आणखी अर्ध्या तासात आम्ही काय नवीन उजेड पाडणार होतो? असो. यथावकाश आम्ही आमचे पेपर त्याच्या केबिनमध्ये सरकवून निघून गेलो...
त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. काही खायची वासना तर नव्हतीच! माझा पेपर पूर्ण सोडवून झाला नव्हता! माझाच काय पण कोणाचाच!!
आता भवितव्य काय? रात्रभर हेच विचार डोक्यात घोळत होते. या अभ्यासक्रमात आत्तापर्यंत अडिच-तीन वर्षे खर्ची घातलेली होती. मग आता अंतिम फळ काय? काहीच नाही?
आणि आता घरी काय कळवायचं? डिग्री न घेताच परत इंडियाला जायचं? पराभूत होऊन?
नाही, नाही, काहीही झालं तरी असं होऊ देणार नाही मी.....
डोळ्यासमोर एकदम त्या प्रयोगशाळेच्या बाहेर असलेले खड्डे चमकले! म्हणजे जॉर्ज अगदीच थट्टा करत नव्हता तर!!!
अगदी ते खड्डे कोणी वापरले नसतील पण त्या तोडीचा विचार अगदीच कुणा विद्यार्थ्याच्या मनात आलाच नसेल का?
छे, छे, काहीतरीच!!!
मनातले विचार मी झटकून टाकले. बेसिनकडे जाऊन तोंडावर नळाचं गार पाणी मारलं.....
लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी म्हणून टीव्ही लावला पण दोनच मिनिटांत वैतागून बंद केला.......
नुसतं पोटातच नव्हे तर सबंध शरीरात काहीतरी डुचमळत होतं.... हिंदकळत होतं...... बाहेर पडण्याची वाट शोधत होतं......
पलंगावर पाय पोटाशी घेऊन पडून राहीलो! अति-तणावाने ओकारी येण्याची वाट पहात.....
त्या रात्री पहाटसुद्धा खूप खूप उशीरा आली.....
दुसर्या दिवशी मला संध्याकाळपर्यंत काम होतं. कामात लक्ष नव्हतंच!! माझं काम झाल्यावर रात्री मी डिपार्टमेंटमध्ये जाउन पहातो तर जॉर्जने त्याच्या केबिनच्या दरवाजावर रिझल्ट चिकटवलेला होता. आम्ही पाच-सहा विद्यार्थीच असल्याने आमचे (अपूर्ण!) पेपर तपासायला त्याला एक दिवसही पुरला होता. रिझल्ट म्हणजे काय तर आमची नांवं आणि समोर पास/फेल लावलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रिझल्टबद्दल चर्चा करायची असल्यास अपॉइंटमेंटचे टाईम-स्लॉटही दिले होते....
अरे हो, सांगायचं राहिलंच!! मी पास झालो होतो!! कसा ते देवालाच माहीत!!!!
मी, तो चिनी मुलगा आणि ती कोरियन मुलगी एव्हढे पास!! बाकी सगळ्यांची दांडी उडाली होती....
सर्वप्रथम मी काय केलं असेल तर धावतच बाथरूममध्ये गेलो आणि भडाभडा ओकलो......सगळं टेन्शन आता बाहेर पडत होतं.....
माझ्या अपॉइंटमेंटच्या वेळेस मी जॉर्जच्या ऑफिसात गेलो. त्याने माझं स्वागत केलं. समोरच्या खुर्चीवर बसवलं. पास झाल्याबद्दल माझं अभिनंदनही केलं....
"तुला तुझ्या पेपरबद्दल काही प्रश्न विचारायचेत का?" तो मृदुपणे म्हणाला. माझी भीड चेपली.
"नाही म्हणजे मला एकच विचारायचं होतं की तुम्ही या पेपरांमध्ये पास-फेल ठरवतांना काय निकष वापरले?" मी शक्य तितक्या डिप्लोमॅटिकली विचारलं. पण तो जॉर्ज होता, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्याने पचवले होते, माझ्या प्रश्नाचा रोख त्याच्या झट्कन ध्यानी आला....
"तुला असं विचारायचय ना की तुम्हा सर्वांचे पेपर अपूर्ण असूनही तुम्ही तिघं पास का अणि बाकीचे फेल का?"
"जवळ जवळ तसंच"
"असं बघ, हा पेपर इतका कठीण होता की मलाही सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आली नसती! मी तुम्हाला शिकवल्यापैकी काहीच इथे डायरेक्टली विचारलेलं नाहीये. पण तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे."
"पण जॉर्ज, मग आता या फेल झालेल्या लोकांचं काय?" जणु काही मी त्यांचा वकील!!
माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पहात जॉर्ज उद्गारला, "वेल! मॅन प्रोपोझेस ऍन्ड जॉर्ज डिस्पोझेस!! त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा! विद्यार्थी जोपर्यंत माझ्या दृष्टीने तयार होत नाही तोपर्यंत मी त्याला पास करणार नाही. आणि मला टेन्यूर असल्याने याबाबतीत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही."
मी गप्प राहिलो. ते पाहून जॉर्जच म्हणाला, "बरं आणखी काही प्रश्न?"
"फक्त एकच!" आता मी पास झाल्यामुळे तो माझं तसं काही बिघडवणार नाही अशी खात्री वाटल्याने मी विचारलं,
"तुम्हाला राग येणार नसेल तर विचारतो. तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतःला 'जॉर्ज' असं संबोधायला का भाग पाडता? तुमच्याकडे डॉक्टरेट आहे, तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, इतकी पब्लिकेशन्स आहेत, प्रचंड नॉलेज आहे, काय बिघडलं आम्ही तुम्हाला प्रोफेसर म्हटलं तर?"
मला वाटलं आता तो मला काहीतरी फेकून मारणार. पण जॉर्ज माझ्याकडे बघत राहिला.... मग शांतपणे म्हणाला....
"तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. वरील सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. येस, आय टीच केमेस्ट्री, आय डू रीसर्च इन केमेस्ट्री, आय पब्लिश इन केमेस्ट्री!!! बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट! माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!! मी ते कधीच सहन करू शकणार नाही...."
मी आ वासुन त्याच्याकडे बघतच राहिलो....
एक साठीच्या घरातला, स्वत:च्या विषयातली अंतिम पदवी असलेला, आपल्या व्यवसायाचा चाळीस वर्षांहून जास्त अनुभव असलेला, स्वत:चं केमिस्ट्रीमध्ये संशोधन अनेकवेळेला प्रसिद्ध केलेला हा शास्त्रज्ञ, हा प्रकांडपंडित, हा ज्ञानाचा हिमालय, मला सांगत होता की अजून मी प्रोफेसर झालेलो नाही....
का? तर माझा विषय प्रोफेस करायची क्षमता माझ्या अंगी अजुन आलेली नाही.....
मी काही न बोलता चट्कन उठुन त्याच्या बुटाला हात लावून नमस्कार केला....
"यू इमोशनल इंडियन्स!!!" मी अश्या प्रकारे व्यक्त केलेला आदर कसा स्वीकारावा हे न कळून तो गुरगुरला,
"नाऊ गो! गेट आउट ऑफ माय ऑफिस, समोसा!! टेक युवर करीयर सिरियसली!!! द होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर यू!! मेक मी प्राऊड, माय सन!!!"
(संपूर्ण)

Friday, July 25, 2008
जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
(पूर्वसूत्रः शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं! देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्या दिवशी वर्गात प्रवेश केला....)
आज वर्गात जरा आधीच जाऊन पोहोचलो. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या ओळखी करून घेतल्या. दोन गोर्या अमेरिकन मुली, दोन मुलगे, एक कोरीयन मुलगी, एक बार्बाडोसची मुलगी आणि एक चिनी मुलगा- एक मुलगी आणि मी! बस्स, संपली वर्गाची लोकसंख्या!! आम्ही एकमेकांची चौकशी करत होतो. कालच्या अनुभवावर हलक्या आवाजात बोलत होतो. आता आपल्यालाच एकमेकांना कसं सांभाळून घ्यावं लागणार आहे याबाबत एकमतास येत होतो.....
इतक्यात जॉर्ज वर्गात शिरला.....
आज त्याच्या हातात काहीही नव्हतं....
जॉर्ज सरळ स्टेजवर गेला आणि एकही शब्द न बोलता आपल्या खिश्यातून खडू काढून त्याने फळ्यावर लिहायला सुरुवात केली.....
फळ्यावर एका ऑरगॅनिक रेणूचे स्ट्रक्चर (आकॄतीबंध) तो काढीत होता. रेणू खूप कॉम्प्लेक्स होता. जसजसा तो आकृती काढत होता तसतशी त्या रेणूची मला हळूहळू ओळख पटत होती.....
त्याचे लिहून झाल्यावर त्याने वर्गाकडे तोंड केलं आणि त्याच्या घनगंभीर आवाजात प्रश्न विचारला,
"डू यू नो व्हॉट धिस इज?"
कुणीच काही बोललं नाही....
त्याची नजर सगळ्या वर्गावरून फिरत शेवटी माझ्यावर स्थिर झाली. मला बारकाईने निरखू लागली, माझं अंग कसल्यातरी अनामिक दडपणाने आकसून गेलं......
"सो मिस्टर समोसा! कॅन यू टेल मी व्हॉट आय हॅव ड्रॉन हियर?" भारतीय असलेल्या माझं नवीन नामकरण झालं होतं.....
"टॅक्सॉल! इट इज द स्ट्रक्चर फॉर टॅक्सॉल!!" मी कसंबसं उत्तर दिलं.
"करेक्ट! नाऊ मिस बहामा-ममा," त्या बार्बाडोसच्या मुलीकडे बघत तो म्हणाला, "डू यू नो व्हाय टॅक्सॉल इज इंपॉरटंट?"
तिने नकारार्थी मान हलवली. पुन्हा त्याचा मोर्चा माझ्याकडे वळला,
"समोसा, टेल हर....." मला जर टॅक्सॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे तर त्याचं महत्वही माहिती असणार हे अचूक जाणून त्यानं मला आज्ञा केली.
"ते काही प्रकारच्या कॅन्सरवर औषध ठरू शकतं!", मी.
"करेक्ट!! तेंव्हा असं बघ बहामा-ममा," परत तिच्यावर जॉर्जचं शरसंधान चालू झालं, "तू जेंव्हा वयस्कर होशील ना आणि आयुष्यभर बार्बाडोसची रम अतीप्रमाणात प्याल्यामुळे तुला जेंव्हा विविध प्रकारचे कॅन्सर होतील ना, तेंव्हा त्यातले काही प्रकारचे कॅन्सर हे औषध वापरून कदाचित बरे होऊ शकतील!!!"
मी हळूच तिच्याकडे पाहिलं. अपमानामुळे आणि रागामुळे डोळ्यात उभं रहाणारं पाणी थोपवायचा ती बिचारी आटोकाट प्रयत्न करत होती.......
जॉर्जला त्याचं सोयरंसुतक नव्हतं. आता त्याने सर्व वर्गाला उद्देशून बोलायला सुरुवात केली....
"हा रेणू औषधीदृष्ट्या महत्त्वाचा तर आहेच पण गंमत अशी आहे की हा फक्त नैसर्गिक स्त्रोतांपासून वेगळा काढण्यातच आत्तापर्यंत मानवाला यश मिळालंय. प्रयोगशाळेत कॄत्रिमरित्या हा रेणू बनवायचे खूप प्रयत्न झाले. त्यातील काही थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाले पण ते सर्व सिंथेसिस इतके गुंतागुंतीचे आहेत की ते फक्त लॅबस्केलवरच करता येऊ शकतात, प्लांटस्केलवर नाही. त्यामुळे या रेणूचं मास प्रॉडक्शन सध्या अशक्य आहे. आज आपण या रेणूचा सिंथेसिस अभ्यासणार आहोत!"
त्यानंतर जॉर्ज अखंड शिकवत होता. बोलत होता, फळ्यावर लिहीत होता. समोर पुस्तक नाही, स्वतःच्या नोट्स नाहीत! त्याच्या डोक्यातून झरझर झरझर विचार येत होते......
त्याने प्रथम तो गुंतागुंतीचा रेणू मेकॅनोचे तुकडे वेगळे करावेत तसा तुकड्या-तुकड्यात विभागून दाखवला (रेट्रो-सिंथेसिस). आता, रेणू आपल्या मनाप्रमाणे वाटेल तसा कुठेही तोडता येत नाही, त्याचे काही नियम आहेत. त्याच्या अंतर्गत ऊर्जेचं वितरण लक्षात घ्यावं लागतं नाहीतर रेणू अनस्टेबल बनतो. जॉर्ज तर फळ्यावर भराभर आणि अचूक लिहीत सुटला होता. हां, मात्र त्याच्या लिखाणात कुठेहि एक वाक्य तर काय पण एक इंग्रजी शब्दही नव्हता! सगळी एकामागून एक स्ट्रक्चर्स!!!
इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये वाक्यांना फारसं महत्त्व नसतं, महत्वाची असतात ती स्ट्रक्चर्स (रेणूंचे आकृतीबंध), ते बनवण्याच्या क्रिया, आणि त्यासाठी लागणारे विविध रीएजन्टस!! तुमच्यापैकी जे सायन्सवाले असतील त्यांना कल्पना असेल. जे सायन्सवाले नसतील त्यांनी आपल्या आसपासच्या कुणातरी बारावी सायन्सला असलेल्या विद्यार्थ्याचं पुस्तक जरूर पहावं! मात्र एक लक्षात घ्या की तो ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पहिला (१०१) कोर्स!! नुसती तोंडओळख!!! त्या पुस्तकाला जर बारीक-बारीक होत जाणार्या नऊ चाळण्या लावून जर त्यातून सर्व इंग्रजी शब्द जर चाळून काढून फेकून दिले आणि सर्व स्ट्रक्चर्स मात्र जर अधिकाधिक गुंतागुंतीची करत नेली जर जे तयार होईल ते ९०१ लेव्हलचं ऑरगॅनिक केमिस्ट्रीचं पुस्तक! ती एक वेगळीच सांकेतिक भाषा आहे, चकल्या-कडबोळ्यांनी बनलेली!!
टॅक्सॉलचा तो महाकाय रेणू जॉर्जने अनेक छोट्या-छोट्या रेणूंमध्ये सोडवून दाखवला. त्यानंतर विविध प्रकारचे रिएजंटस वापरुन ते छोटे तुकडे कसे बनवता येतील आणि एकमेकांशी कसे जुळवता येतील त्यावर विवेचन केलं. आम्ही भान हरपून बघत आणि ऐकत होतो! हो, अगदी बहामा-ममा सुद्धा सर्व अपमान विसरून गुंगून गेली होती.....
किरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!!!
तास संपल्याच्या बेलने आम्हाला जाग आणली. पन्नास मिनिटं कशी गेली हे कळलंसुद्धा नव्हतं!!! जॉर्जने हातातला खडू परत खिशात टाकला आणि एकही शब्द न बोलता तो वर्गाबाहेर पडला.....
आम्ही सगळे तिथेच खिळून राहिलो. एक गोष्ट सर्वांना आता न सांगता स्पष्ट झाली होती.
हा विषय शिकवायची जॉर्जची हातोटी असामान्य होती. त्याचं विषयाचं ज्ञान बिनतोड आणि अतिशय उच्च दर्जाचं होतं. नाहीतर असा एक क्लिष्ट विषय शिकवतांना वर्गाचं भान हरपून दाखवणं ही सामान्य गोष्ट नव्हती. पुढ्यात बसलेले विद्यार्थीही काही गणेगंपे नव्हते. आम्ही सर्वांनी हा विषय यापूर्वी सलग पाच-सहा वर्षे अभ्यासलेला होता. काहींनी त्यावर स्वतंत्र लिखाणही प्रसिद्ध केलेलं होतं. असाच कुणी लेचापेचा प्रोफेसर असता तर आम्ही त्याला केंव्हाच फाडून खाल्ला असता!! केमिस्ट्री डिपार्ट्मेंटने हा अंतिम वर्ग जॉर्जला शिकवायला उगीचच दिलेला नव्हता, कदाचित त्याची सर्व दादागिरी सहन करूनसुद्धा!!!
आता त्याचा तास मी काही केल्या चुकवत नव्हतो. धावत-पळत, कधीकधी तर नोकरीवरून सुटल्यासुटल्या भुकेल्या पोटी जाउन वर्गात बसत होतो. जॉर्जच्या शिकवण्याच्या स्टाईलने तशी भूलच आम्हा सर्वांवर घातली होती.....
एकदा तर कमालच झाली. त्या दिवशी सबंध दिवसभर पावसाची रीघ लागली होती. दुपारी तर वादळी वार्याचं फोरकास्ट होतं. कामावरून सुटल्यावर युनिव्हर्सिटीची कॅम्पस बस पकडून वर्गात यायला मला जरा उशीरच झाला. अपराधीपणे "सॉरी, सॉरी" पुटपुटत मी वर्गात शिरलो आणि अंगावरचे पाण्याचे थेंब पुसत आता उशीरा आल्याबद्द्ल जॉर्ज मला कसा आणि किती सोलून काढतोय याची प्रतिक्षा करत राहिलो....
पण आज त्याचा मूड वेगळा होता....
"वेलकम मिस्टर इंडिया!" त्यानं माझं स्वागत केलं. आज मी समोसा नव्हतो. मग सगळ्या वर्गाकडे बघून तो म्हणाला,
"बघा, मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, कितीही पाऊस पडला तरी हा येणारच म्हणून! अरे पावसाची भीती तुम्हाआम्हाला! तो तर लहानपणापासून मान्सूनचा वर्षाव सहन करत वाढलाय!!" म्हटलं तर विनोद, म्हटली तर चेष्टा. मी गप्प राहिलो.
"पण खरंच! जेंव्हा मान्सूनचा बेफाट पाऊस कोसळतो तेंव्हा तुम्ही लोकं काय करता?" त्या अमेरिकन चिमणीने खरंतर मला प्रश्न विचारला होता, पण उत्तर मात्र दिलं जॉर्जने....
"अगं त्यात अवघड काही नाही! जेंव्हा असा खूप पाऊस पडतो तेंव्हा हे लोक त्यांच्या पाळीव हत्तीच्या पोटाखाली जाऊन दडून बसतात! मग वरून कितीही पाऊस पडला तरी चिंता नाही. काय खरं की नाही मिस्टर इंडिया?" चेहरा विलक्षण मिश्किल करून जॉर्ज वदला. हे ऐकुन मलाही हसू आवरलं नाही.
"अगदी खरं!" मी दुजोरा दिला....
"नाऊ बॅक टू बिझनेस" असं म्हणून त्याने शिकवायला सुरवात केली. कुठली तरी क्लिष्ट रासायनिक अभिक्रिया होती. शिकवता-शिकवता मध्येच थांबला....
"आता जर मी या अशा स्टेप्स घेतल्या तर याच्या पुढची स्टेप काय येईल?" त्यानं वर्गाला प्रश्न केला.
हा सिंथेसिस यापूर्वी जगात कोणीच फारसा केलेला नसल्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होतं. आम्ही कोणीच हात वर केला नाही. मी तर खिडकीबाहेर नजर लावली. आभाळ काळ्याशार ढगांनी खूप अंधारून आलं होतं. आता कधीही जोराचं वादळ होणार अशी लक्षणं दिसत होती.
"सो कॅन यू गिव्ह मी ऍन आन्सर?", जॉर्जने त्या दोनापैकी एका अमेरिकन विद्यार्थ्याला विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली....
"नुसतं डोकं हलवू नकोस, उठून उभा रहा! जरा ताजं रक्त वाहू दे तुझ्या मेंदूपर्यंत!!" जॉर्ज.
तो मुलगा गुपचूप उभा राहिला....
"आता सांग!" तो मुलगा गप्प...
"नांव काय तुझं?" नेहमी आम्हाला टोपणनावांने हाक मारणार्या जॉर्जला आमची खरी नांवं माहीती असायची गरजच नव्हती.
"जॉन" तो मुलगा म्हणाला.
"गुड! जॉन, घाबरू नकोस! इकडे ये" जॉन स्टेजवर गेला. त्याच्या हातात आपला खडू देत जॉर्ज म्हणाला,
"डोन्ट वरी! टेक धिस चॉक ऑफ सुप्रीम विझडम फ्रॉम मी!! ऍन्ड नाऊ राईट डाऊन द नेक्स्ट स्टेप!!!"
आम्ही सगळे त्या "चॉक ऑफ सुप्रीम विझडम" वर हसू दाबत आता जॉन काय करतो ते पाहू लागलो.....
जॉन काय करणार, कपाळ? त्याला बिचार्याला पुढची स्टेप माहितीच नव्हती. जॉर्जने खूपच दबाव आणला म्हणून त्याने फळ्यावर काहीतरी खरडलं. ते अर्थातच साफ चूकीचं होतं......
आम्ही सगळे श्वास रोखुन जॉर्ज या बिचार्या पोराचं आता काय करतो ते बघू लागलो. इतक्यात.......
कडाडऽऽऽ काऽड काऽऽड!!!!
बाहेर लख्खकन वीज चमकली आणि पाठोपाठ कानठाळ्या बसवणारा कडकडाट झाला........
आम्ही सगळेच दचकलो......
जॉर्ज स्थिर नजरेने जॉनकडे पहात होता.....
"डॅम्न यू, जॉन!!" जॉर्ज खिडकीकडे हात करत पण नजर जॉनवरच रोखून ठेवत त्याच्या खोल आणि धीरगंभीर आवाजात उद्गारला, "फरगेट मी, जॉन! बट इव्हन द गॉड हिमसेल्फ डज नॉट ऍप्रूव्ह युवर आन्सर!!!"
वर्गात हास्याचा कल्लोळ उडाला!!!
त्यामध्ये सहभागी होत जॉर्ज पुढं म्हणाला, "फ्रॉम टुडे, यू आर नॉट जॉन!! यू बीट्रेयड द गॉड!!! फ्रॉम टुडे युवर नेम इज "जूडास!!!!"
कीर्रर्रर्रर्रर्र........
हास्याच्या कल्लोळात तास संपला......
असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही....
आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता!!
मग एकदा ती वेळ आली.......
काळरात्रीची भयाण वेळ.........

Wednesday, July 23, 2008
जॉर्ज कॉल्डवेल
तास सुरु व्हायला दोन-तीन मिनिटं शिल्लक होती.
मी घाईगडबडीतच वर्गात शिरलो. वर्गात माझ्याखेरीज आणखी फक्त दहा-बारा मुलं-मुली जमली होती. त्यात अस्वाभाविकही काही नव्हतं! सेंद्रीय रसायनशास्त्राचा (ऑरगॅनिक केमिस्ट्री) ९०१, म्हणजे शेवटचा वर्ग होता तो! या विषयाची मास्टर्सची डिग्री तुमच्याकडे असल्याशिवाय वा तुम्ही ६००, ७०० आणि ८०० लेव्हलचे वर्ग उत्तीर्ण केल्याशिवाय या वर्गात मुळी प्रवेशच नव्हता!! या वर्गात असणारे फक्त रसायनशास्त्रज्ञ, फार्मासिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट!!
दोन हजार पानांचं एक जाडजूड पुस्तक या चार महिन्यांच्या क्लासला सिलॅबस म्हणून लावलं होतं!! ते बघूनच माझी छाती दडपून गेली होती. पुढले चार महिने अगदी पिट्टा पडणार होता!! पण काय करणार, जर डिग्री हवी असेल तर हा कोर्स पास होणं आबश्यकच होतं, तसा युनिव्हर्सिटीचा नियमच होता....
एक रिकामी जागा बघून मी टेकतो न टेकतो तर दाण दाण दाण असा पावलांचा आवाज करीत प्रोफेसरसाहेब वर्गात शिरले. त्यांच्याहि हातात असलेलं ते जाडजूड पुस्तक त्यांनी धाडकन त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर आदळलं. सगळ्या वर्गाकडे बॅटसमन जशी फिल्डींग बघून घेतो तशी नजर फिरवली. आणि अतिशय घनगंभीर आवाजात बोलायला सुरवात केली,
"धिस इज ऑरगॅनिक केमिस्ट्री ९०१ क्लास!! फॉर दोज ऑफ यू हू डिड नॉट नो दॅट, धिस इज द राईट टाईम टू गेट अप ऍन्ड गेट लॉस्ट!!"
कुणीच उठलं नाही. बहुदा सगळ्यांना आपण कुठे आलोय हे माहिती असावं!!
"गूड!! माय नेम इज जॉर्ज कॉल्डवेल!! आय हॅव बीन टीचिंग धिस क्लास फोर द लास्ट टेन इयर्स! यू विल कॉल मी जॉर्ज!! इफ आय हियर यू कॉलिंग मी एनिथिंग एल्स, प्रोफेसर ऑर समथिंग एल्स, आय विल बीट द क्रॅप आउट ऑफ यू!!!"
आयला, हा तर फुल धतिंग प्रोफेसर दिसतोय, माझ्या मनांत आलं!
"पण तुम्ही आम्हांला काय हाक मारणार?" एक अमेरिकन विद्यार्थिनी चिवचिवली. तिच्याकडे अत्यंत तुच्छतेने बघितल्यासारखं करीत जॉर्ज म्हणाले,
"दॅट इज टोटली अनइंपॉर्टंट फॉर मी. मी तुम्हाला कदाचित तुमच्या प्रथम नांवाने हाक मारीन, किंवा त्यावेळेस माझा मूड जसा असेल त्याप्रमाणे एखादं टोपणनांवही ठेवीन!! पण एक नीट ध्यानात ठेव, जसजसा हा कोर्स पुढे जात राहील तसतसं मी तुम्हाला काय हाक मारली यापेक्षा मी जर तुमचं नांवच घेतलं नाही तर तुम्हाला जास्त आनंद होईल."
वर्गात सन्नाटा पसरला. सगळे जॉर्जच्या नजरेला नजर न देता खाली नजर लावून बसले......
इतक्यात पुन्हा दाणकन आवाज झाला म्हणून आम्ही दचकून वर पाहिलं. जोर्जने ते दोन हजार पानी पुस्तक उचलून परत टेबलावर आदळलं होतं......
"हे पुस्तक सिलॅबसला लावलंय युनिव्हर्सिटीने!! हे वाचायची आणि शिकायची जबाबदारी तुमची!! लिहा-वाचायला येतंय ना? उत्तम!! कारण मी यांतलं काहीही शिकवणार नाहीय!!"
अरे म्हणजे मग हा बाबा शिकवणार तरी काय? आणि ते दोन हजारपानी पुस्तक कोणीही न शिकवता आम्ही आत्मसात करायचं तरी कसं? पण जॉर्जचं अजून समाधान झालं नव्हतं!! त्यानं भराभरा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो फक्त आद्याक्षरं लिहीत होता, मी तुमच्या सोईसाठी कंसात फुलफॉर्म लिहिलाय......
जे. ऍम. केम. सॉक. (जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी)
जे. ओ. सी. (जर्नल ऑफ ऑरगॅनिक केमिस्ट्री)
जे. सिन. ऑर्ग. केम. (जर्नल ऑफ सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री)
टेट. लेट. (टेट्राहेड्रॉन लेटर्स)
"या चार नियतकालिकांचे गेल्या वर्षाचे सर्व अंक परीक्षेसाठी अभ्यासाला असतील. जर्नल कसं वाचायचं ते तुम्ही आत्तापर्यंत शिकला असालच! नसलात तरी मी शिकवणार नाही!! आर्ट्स डिपार्टमेंटला कुठेतरी प्लेबॉय कसा "वाचायचा" ते शिकवणारा एखादा कोर्स असेल तर तो घ्या!"
आम्ही इतके दडपुन गेलो होतो कि त्याच्या प्लेबॉयवरच्या विनोदाला हसायचंसुद्धा कुणाला भान नव्हतं!! अहो कसं असणार? या सर्व जर्नल्सचे दर महिन्याला (काहींचे तर दर आठवड्याला) प्रत्येकी दोनशे पानांपेक्षा मोठे अंक निघतात!! अहो गेल्या अख्ख्या वर्षाचे अंक झाले किती? आणि त्यांची पाने झाली किती? आता ते दोन हजारपानी पुस्तक एकदमच क्षुल्लक वाटायला लागलं होतं!!
"तुम्हाला माहिती आहेच की हा नुसता थियरी कोर्स नाही, याच्यासोबत लॅबही (प्रॅक्टीकल) आहे. चला, आपली लॅब बघून येऊ!!" असं म्हणून जॉर्ज वर्गाबाहेर पडला....
आम्ही सगळे त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. लॅबोरेटरी इमारतीच्या दुसर्या टोकाला होती...
बरोबर चालता चालता मी जॉर्जचं निरीक्षण करत होतो. साडेपाच फूट उंची, किंचित स्थूल शरीरयष्टी, गोरा कॉकेशियन वर्ण, निळे डोळे, चेहर्यावर कार्ल मार्क्ससारखी भरघोस पण बरीचशी पांढरी झालेली ब्राऊन दाढी, अंगात प्रोफेसरांचा पेटंट ढगळ सूट आणि नाकावर ओघळलेला चष्मा!!
कोणाचाही प्रेमळ आजोबा शोभेल असं रूप होतं! पण त्याच्या अगदी विरूद्ध अतिशय घनगंभीर व खणखणीत आवाज, अगदी जेम्स अर्ल जोन्स सारखा, आणि अत्यंत तिखट जीभ!! जिचा पहिला प्रत्यय आम्ही काही मिनिटांपूर्वीच घेतला होता.....
लॅबमध्ये गेल्यावर तिथल्या असिस्टंटने आम्हाला आपापले टेबल्स, लॉकर्स वाटून दिले. आम्हाला वाटलं संपलं! पण जॉर्जच्या हातात एक कागदी पाकीट होतं. त्यातून त्याने काही चाव्या बाहेर काढून आम्हाला प्रत्येकी एक दिली.
"ही या लॅबच्या मुख्य दरवाजाच्याची चावी!! माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा हा कोर्स सुरू झाला की तुम्हाला इथे फक्त ८ ते ५ अशा कामाच्या वेळेत येऊन प्रयोग करायला वेळ मिळणार नाही. रात्री-बेरात्रीच काम करावं लागेल. त्यासाठी ही चावी!! माझा सल्ला असा आहे की दिवसा जर वेळ मिळाला तर तो लायब्ररीत घालवा आणि रात्री इथे काम करा. तरच तुमच्याने निभेल."
आम्ही विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांची ओळख नसूनही परस्परांच्या भावना समजल्या! आता समदु:ख्खी होतो ना आम्ही!!
"सगळेजण इकडे या", जॉर्ज एका खिडकीशी उभा राहून आम्हाला तिथे बोलावीत होता. आता काय आणखी? आम्ही तिथे गेलो. पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून बाहेर खाली काही उंचवटे आणि काही खड्डे दिसत होते. काही उंचवटयांवर हिरवळ होती, काहींवर नव्हती. सगळीकडे उत्तम लॅन्डस्केपिंग असलेल्या त्या युनिर्सिटीमध्ये हा भाग अगदी विद्रूप दिसत होता. कदाचित काम अर्धवट झालं असावं.......
"तुम्हाला माहितीय हे काय आहे?", जॉर्ज भविष्यवाणी केल्याप्रमाणे म्हणाला, "माझ्या या कोर्सचा मानसिक ताण सहन न होऊन मध्येच आत्महत्या केलेल्या माजी विद्यार्थ्यांची ही थडगी आहेत! आणि ते खोदलेले खड्डे आहेत तुमच्यासाठी!! तुमच्यापैकी किती जण ते वापरतात ते आता बघायचं!!! हा, हा, हा, हा!!!!!!"
साला, याला आता माणूस म्हणायचं की हैवान!!!!
त्यानंतर उरलेला दिवसभर मी बेचैन होतो. मनात जॉर्ज आणि त्याचा कोर्स सोडून दुसरे विचारच येत नव्हते. सायंकाळी कट्ट्यावर मला गप्प गप्प पाहू मित्रांनी छेडलं.....
'काय बाबा, तू आज गप्प कसा?"
"अरे तो प्रेमात पडला असेल! कुठल्यातरी निळे डोळेवालीच्या!" दुसर्याने माझी फिरकी ताणायचा प्रयत्न केला....
" तिच्यायला, प्रेमात कसला पडतोय, इथे गळ्याला फास लागायची पाळी आलीय", मग मी त्यांना सगळा किस्सा सांगितला....
'जॉर्जच्या ९०१ कोर्समध्ये आहेस तू?" मला सिनीयर असणारा विनोद खिदळला, " मग फूल मेलास तू!! थडगी दाखवली की नाही त्याने? आत्ताच कोणतं ते निवडून ठेव!!"
याला म्हणतात शुभ बोल रे नार्या!!!
"तू पास केलायस हा कोर्स?" मी आशेनं विचारलं. चला, जॉर्ज कसा शिकवतो ते तर कळेल, कदाचित जुन्या नोट्सही मिळतील!!
"मी? हॅ!!!! पहिल्या चाचणी परीक्षेतच माझी दांडी उडाली. तिथेच सोडला तो कोर्स!!! आता तर त्याच्या समोरही उभा रहात नाही मी! दुरून तो येतांना दिसला तर मी फुटपाथ बदलतो. तिच्यायला, त्याच्याकडून कातडी सोलून घेण्यापेक्षा थोडं जास्त चालावं लागलं तरी हरकत नाही!!"
"तुझं ठीक आहे, तू जेनेटिक्सचा विद्यार्थी! तुला हा कोर्स नाही घेतला तरी चालण्यासारखं आहे. पण मला तो घेतलाच पाहिजे डिग्री मिळवण्यासाठी!" मी.
"म्हणुनच तर म्हटलं की तू मेलास आता! काय इंडियात आई-वडिलांना काही अखेरचा निरोप वगैरे द्यायचा असेल तर देऊन ठेव!!" विनोद आणखीनच चेकाळला.....
"ए तुमको एक बॉत पूछूं क्या? गोस्सा मोत कोरना", शोन्मित्र म्हणाला, "तुमारा ओर होमारा साइझ तो एक हॉय. अगर तुम मर गोया तो तुमारा सब कपडा मै लिया तो चोलेगा क्या?"
हे असले हलकट मित्र असल्यावर आणखी काय पाहिजे!! साल्याला माझ्या मरणापेक्षा माझे कपडे जास्त महत्त्वाचे वाटत होते......
शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं....
देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्या दिवशी वर्गात प्रवेश केला....

Subscribe to:
Posts (Atom)