Saturday, February 7, 2009

गुणामामा

खूप सालांमागली गोष्ट. मी त्यावेळेस कालेजात जात होतो. बोरीबंदरावरचं सेंट झेवियर कालेज! किरीस्तांव मिशनर्‍यांनी चालवलेलं! त्यातही गोव्याच्या मिशनर्‍यांचा भरणा जास्त!!! कालेजाच्या दुसर्‍या वर्षाची परीक्षा संपलेली. दुसर्‍या वर्षाचा निकाल घेऊन भायेर पडतेवेळी वर्गाच्या व्हरांड्यात पाद्री प्रिंन्सीपलसायबांची गाठ पडली....

"कायरे रिझल्ट कसो लागलो?"
"बरो आसां!"
"मग आता सुटीतलो काय बेत?"
'काय नाय, जरा गावांकडे जावंन येयन म्हणतंय!!"
"आसां? छान, छान! गावाकडे जातलंय तर माझां एक काम कर मारे!"
"काय?"
'मी तुका एक पार्सल दितंय, जरा पिलाराक जावंन पोहोचव मारे!"

गोव्यात पिलार गावात किरिस्तांव पाद्र्यांची धर्मगुरू तयार करायची शाळा आहे. बाकी हे सगळे पाद्री तसे सडेफटिंग! त्यांना बायकोपोरांचा काय त्रास नाय! पण मैत्री करण्यामधे एकदम पटाईत! बहुदा जुन्या दोस्तमंडळींसाठी मुंबयहून कायतरी पाठवायचं असेल!!

"चलांत! द्या तुमचां पार्सल!!", मी. बाकी आणिक मी काय म्हणणार? कालेजाच्या प्रिन्सीपलसायेबाला नाय म्हणायची काय बिशाद आमची?

त्यांचं पार्सल घेऊन घरी आलो तर घरी आईबरोबर तेच संभाषण......

"काय? आता सुटी लागली तर कायतरी कामाचा करशीत का मेल्या अख्खो महिनाभर उगीच भिंतेक तुमड्यो लावंन बसतलंय?", आईच असल्याकारणाने संवाद जरा जास्त लडिवाळ!!!
'कायतरी करीन पण आत्ता नाय, थोड्या दिवसांन!"
"मगे आत्ता काय करतलंय?"
"जरा आजोळाक जावंन येईन म्हणतंय!", मी.

आईने जरा नवलाने माझ्याकडे बघितलं.....
"आसां म्हणतंय? जा बाबा, जावंन ये. तुझ्या आजी-आजोबाक बरां वाटांत! माका तर काय या रगाड्यात्सून उठून जावंक उसंत गावणा नाय, जरा तू तरी जावंन ये. तेंका म्हणा तुमची खूप आठवण येतां...." आईने आपल्या आई-बापाच्या आठवणीने डोळ्याला पदर लावला.....

माझं काम फत्ते!!!! एकदा आजोळी जायला मला आईची परमिशन मिळाल्यानंतर "नको जाऊ" म्हणण्याची चूक करण्याइतके बाबा खुळे नव्हते!!! त्यांची आपली एकच मागणी....

"जातंय तर जा, पण येतेवेळी माकां थोडो काजीचो सोरो घेवंन ये! औषधी असतां!!!!!"
"अहो लहान पोर तो, तेका कशाक आणूक सांगतास? खंय काय गोंधळ झालो मगे?", कनवाळू मातृदेवता.
"काय होवूचां नाय! रे, तुझ्या गुणामामाक सांग वस्तू पॅक करूक!!! तो सगळां बरोबर जमवून आणतलो!!!"
"हो! आणतलो!!! काय पण मेव्हण्या-मेव्हण्यांची जोडी आसां जमलेली!!!! तेवेळी माझ्याऐवजी गुणाजीबरोबरच लगीन करूंचा होतांत!!", आईचा त्रागा.....
"अगो तां सुचलांच नाय ते वेळेक!! आणि तुझ्यासारखी फिगर खंय आसा त्याची?", बाबांचं म्हटलं तर चिडवणं, म्हटली तर आईची समजूत घालणं!! त्यांचं प्रेम हे असंच! जवळ असले म्हणजे वादावादीला ऊत आणि जरा लांब गेले की एकमेकांच्या काळजीने हैराण होणार!!! कुठूनही काय, आम्हां पोरांच्या डोक्याला ताप करायचा!!!!

दुसर्‍या दिवशीच सांजेच्या टायमाला परळ-सावंतवाडी एष्टीची आरामगाडी पकडली! आरामगाडी नुसती म्हणण्यासाठीच हो!!!! आराम तर सोडाच पण एष्टीवाल्याने मेल्याने तीन घंटे उशीराने पोचवली वाडीला (सावंतवाडीला स्थानिक लोकं नुसती वाडी म्हणतांत). महाडच्या जवळ मेल्याचा टायरच बसला. ते सगळं क्रियाकर्म यथासांग पूर्ण होइपर्यंत आम्ही तिथेच!!! तिथून गावाची एष्टी तासाभराच्या प्रवासासाठी! त्या बसगाडीला मात्र आरामगाडी म्हणायची एष्टीवाल्यांचीसुद्धा हिंमत नव्हती!!!!

गावाच्या बसष्टँडावर उतरलो आणि नेहमीप्रमाणे मुंबयकराच्या भोवती पोरांसोरं जमा झाली. त्यातल्याच येका मुलग्याला पुढे धाडलं....
"जा रे! धावत जावंन गुणामामाक सांग त्येचो भाचो आयलोसा म्हणान!!", त्याला 'कोण गुणामामा' हे सांगायची गरज पडली नाय...

दुसर्‍या मुलग्याच्या डोकीवर बॅग देऊन रस्त्याने दोन फर्लांग चालून आलो तर पाणंदीच्या तोंडाशी गुणामामा हजर!!!!

"अरे आयलो रे, मुंबयचो सायेब आयलो!!! शिंदळीच्या तुझ्या आजोळाक तू इतको विसारलंस!!! शिरां पडो तुजे तोंडार!!!!!" मला आपल्या मिठीत घेत अस्सल इरसाल कोकणी स्वागत!

घरात येऊन पोहोचलो. आजी-आजोबांच्या पाया पडून आणि त्यांच्याकडून कुरवाळून घेऊन झालं. मी त्या बॅग उचलून आणलेल्या पोराला किती पैशे झाले ते विचारलं....

"तू थेट आत जा", गुणामामा गुरगुरला.
"अरे पण तेची हमाली?"
"तू मुकाट आत जा! धू म्हटल्यावर धूवूचा, लोंबता काय म्हणान विचारू नको!!!!! आणि काय रे सावळ्या, मेल्या माझ्या भाच्याकडे पैशे मागतंय, साल्या उपाशी मरत होतंय तेंवा तुका रोजगाराक कोणी लावलो रे? तुज्या आवशीक खावंक व्हरान......"

पुढला संवाद ऐकायला मी तिथे थांबलो नाय.....

दुसर्‍या दिवसापासून माझा कोकणी दिनक्रम सुरू झाला. रोज सकाळी उठल्यावर घरच्या दुधाचा चहा, दहा-साडेदहाला न्याहारी! उकड्या तांदळाची पेज, आजीने केलली फणसाच्या कुयरीची नायतर केळफुलाची मस्त काळे वाटाणे घालून भाजी आणि सोबतीला सुक्या बांगड्याचा घरचं खोबरेल लावलेला तुकडा!!!! अमृत गेलं झक मारत!!!

न्याहारी उरकल्यावर मी आंघोळ करूयां म्हणतोय तर गुणामामाने हाळी दिली....
"रे भाच्या, काय येतंय काय माझ्यावांगडा (सोबत) बाजारात? की पडतंय हंयसरच अजगर होवंन?"
"बाजारात?"
"हां, काय नुस्ते (मासळी) गांवतंत बघूया! आज सोमवार म्हणान माकां काय फारशी आशा नाय, पण तरी बघंया!!"
"अरे पण आज्येचो सोमवार नाय आज? आज नुस्ते कशे चलतीत?", माझी शंका.
"अरे खुळ्या, हंयसर काय तुझ्या मुंबयसारखी एकच गॅसची चूल नाय! तुझ्या आज्येक करां देत तिचा शिवरांक (शाकाहारी) सोवळां स्वयपाकघरात! आपण सुशेगाद (आरामात) परसातल्या चुलीवर नुस्त्याची भट्टी पेटवयांत!!!"

मला ही आयडिया बेहद्द आवडली! साली मुंबयेतपण एक कोळशाची शेगडी आणून ठेवायला हवी, सोमवारी बांगडे भाजायला!!!!

आम्ही बाजाराच्या रस्त्याला लागलो. आमचं घर पुळणीच्या अगदी जवळ आहे. इतकं, की समुद्राची गाज घरात आयकू येते. घरापासून दोन फर्लांगाची वाळूने भरलेली पांदण त्यानंतर मग दोन फर्लांगाचा तांबड्या मातीचा आता खडी टाकून दाबलेला रस्ता आणि मग शेवटी बसथांब्याजवळ बाजार. पाणंदीतून जाताना गुणामामा आमची चौकशी करत होता. माझं कालेज, आई-बाबांची तब्येत, धाकट्या भावंडांचं कौतुक, मुंबयची हाल-हवाल इत्यादि. मी आपला त्याला माहिती पुरवीत होतो. जसे आमी तांबड्या रस्त्याला लागलो तशी रस्त्यावरची वर्दळ वाढली. रस्त्यावरचा प्रत्येक माणूस गुणामामाची विचारपूस करत होता आणि गुणामामा आता प्रत्येकाशी काय ना काय संवाद करत होता. शिव्यांचा जणू नैऋत्य मोसमी मान्सून बरसत होता. मी आपला निमूटपणाने त्याच्यापाठोपाठ जात होतो. त्याचं माझ्यावरचं लक्ष उणावलेलं बघून त्याचं निरिक्षण करीत होतो....

साडेपाच फूट उंची, शेलाटी कोकणी शरीरयष्टी, अंगात एक निळसर हाफ शर्ट आणि मुळातला सफेद पण आता मातीने तांबडा पडलेला पायजमा! गोरा सफेद वर्ण आणि हिरवे डोळे. मुळातले तपकिरी केस कोकणच्या उन्हाने आणखी भुरे झालेले. मनात विचार आला की जर ह्याला सूट टाय चढवला आणि फाडफाड इंग्रजी बोलायला लावलं तर हा युरोपीयन नाय असं म्हणायची कोणाची हिंमतच होणार नाय!!!! शिक्षण तसं फक्त मॅट्रिकपर्यंतच पण वाचनाची तुफान हौस!! सगळ्या मराठी संतमंडळींच्या आणि लेखक-कविंच्या ओळी (त्यातही जास्त शिव्यागाळी!) ह्याला पाठ!!!!! ह्याला कुणाची भीड पडत नाय आणि कुणाला ह्याच्या शिव्या अंगाला टोचत नायत! सगळ्या गावाला माहिती की गुणामामा म्हणजे तोफखाना!!!! अगदी स्वतःच्या बनवलेल्या शिव्यागाळी आणि काव्यपंक्ति!!!!

मला एक जुना प्रसंग आठवला. त्यावेळी आम्ही लहान असतांना एकदा आजोळी आलो होतो. मी सात-आठ वर्षाचा आणि धाकटा भाऊ अगदी तीन-चार वर्षांचा. तेंव्हा गावात संडास झाले नव्हते. सगळी माणसं माडाच्या मुळाशीच बसत. आमी मुंबैत वाढणारी मुलं! आम्हाला त्या रानाचं आणि माडाच्या झावळ्यांच्या वार्‍यावर होणार्‍या आवाजाचं भय वाटे. तेंव्हा परसाकडे जायची पाळी आली की आजी गुणामामाला आमच्या सोबतीला धाडी. तिथेसुद्धा मी तांब्या घेवंन माडाच्या मुळाशी बसलोय आणि ह्याची शिकवणी आपली चालूच!!!

"रे मेल्या, ह्या आत्ता तू काय करतसंय? जरा वर्णन कर!!!!", गुणामामा.
"परसाकडे बसलसंय!!!", माझं लाजून थोडक्यात उत्तर.
"अरे असां नाय! शाळेत जातंस मा तू? मग काव्यात वर्णन कर बघू?" मी गप्प! आता अगदी चांगल्या शाळेत गेलो म्हणून काय झालं? मलविसर्जनाच्या क्रियेचं काव्यात वर्णन कसं करणार मी?
"नाय येणां?", गुणामामा वदला, "अरे असली कसली रे शाळा तुझी? काय्यच शिकवणां नाय पोरांक!!!! आता ऐक...

"सडा शिंपला,
शंख फुंकीला,
दशरथ राजा
घसरत आला......"

मी जोराने हसायला लागलो! इतक्या जोराने की माझा धक्का लागून पाण्याचा तांब्या कलंडला!!! सगळं पाणी त्या वाळूच्या जमिनीत झिरपून गेलं!!!!!

"गुणामामा, माझो तांब्यो उलाटलो! आतारे काय करू मी?", माझा केविलवाणा प्रश्न....
"काळजी करा नुको! ही घे नागवेलीची दोन पानां!!", पोफळीवर चढलेल्या नागवेलीची दोन विडयाची पानं माझ्या हातात देत मामा म्हणाला,
"रोज आमी गाववाले तांबडो विडो बनवतोंव, आज तुमचो मुंबईकरांचो पिवळो विडो!!! जा, तुझ्या आजोबाक नेऊन दी!!!"

मला त्या आठवणीने आताही हसू आवरेना. तोवर आम्ही बाजारात पोचलों. बाजार नुकताच भरत होता. कोकणातले मासळीबाजार साडेदहा-अकराच्या आत भरतच नाय. नुस्ते नुकतेच रापणीवरून येत होते. कोळणी बायकामाणसां ते पाण्याने साफ करून फळीवर मांडत होती. गुणामामाने एक चक्कर टाकून अवघ्या बाजाराचा अंदाज घेतला आणि मग एका कोळणीसमोर जाऊन उभा राहिला......

"काय गो शेवंत्या! काय ताजे नुस्ते हाडलंस आज की सगळो आयतवाराचो (रविवारचा) शिळो माल?", सगळ्या बाजाराला ऐकू जाईल अशा आवाजात गुणामामा विचारता झाला.....

"कायतरी काय गुणामामा! बघ सगळो ताजो माल आसां"
"काय देतंस?"
"बघ खापी आसंत, बांगडे आसंत, सौंदाळे आसंत....."
"अगो माझो हो भाचो मुंबयसून इलो आसां." मामा गरजला, "तेका काय हो कचरो खावंक घालू? मगे परत गावाचां तोंड तरी बघात काय तो?"
"थांब हां जरा, पाटयेत बघान सांगतय!...... ही बघ विसवण (सुरमई) असां! चलांत?"
"हां चलात! नशीब, माशे पागणार्‍या घोवाची लाज राखलंय!!! काय भाव घेतलंय?"
"पन्नास रुपये!!!"
"पन्नास रुपये? आगो काय विसवणीचो भाव सांगतंय की तुझो?"

अरे माझ्या देवा मंगेशा! मला वाटलं की हिथे आता महाभारत पेटणार!!!! एका कोळणीला हा प्रश्न? आता ही कोयता काढून भर बाजारात गुणामामाला खापलणार!!! मी तर भीतीने पार गारठून गेलो.......

पण तसं कायच घडलं नाय......

"काय मेल्या गुण्या, तुज्या तोंडाक काय हाड? अरे मेल्या त्या धाकल्या झिलग्यासमोर बोलतांना तरी काय जरा लाज बाळग!", शेवंत्या कोळीण मग मला म्हणाली,
"काय बाबा, मुंबयच्या शाळेत जातंस?"
"हां, कालेजात जातंय", माझं काळीज अजून धडधडत होतं.......
"जा बाबा जा! भरपूर शीक! तुज्या या इकाळ्या पावसाच्या मामाच्या वळणावर जाव नको!! तो मेलो आसलोच आसां, शिंदळीचो!!! आवशी-बापाशीन लगीन नाय केला हेचा वेळेवर आनि आता आमकां तरास आणतां!! गावउंडगो मेलो!!!

मला वाटलं की ब्रम्हचारी मामा आता याच्यावर कायतरी स्वत:चा पावशेर ठेवील, पण तो नुसताच हसला......

आम्ही बाजार घेऊन घरी येतेवेळी मी मामाला म्हटलं,
"रे मामा, कित्याक रे उगाच त्या कोळणीक असो बोललंय? तिणां तुजावांगडा भांडाण केला असता भर बाजारात मगे?"
"अरे तसां नाय!", मामा हसून म्हणाला, "अरे माझ्या ओळखीची आसां ती शेवंता! आमी प्राथमिक शाळेत एकाच वर्गात होतोंव!! तेची आउस आन तुजि आजी, जुनी ओळख आसां!! पुढे ती तिच्या धंद्यात गेली कोळणीच्या!!"
"आणि तुमी तुमच्या धंद्यात!! बामणकीच्या!!!" मी.
"बामणकीचो कसलो धंदो?"
"होच! गावभर फिरान शिवेगाळी करूचो!!!" मी.
माझ्या डोक्यावर टप्पल देत गुणामामा खळखळून हसला, "व्वा!! माझो भाचो शोभतंस बघ!!!!"

कर्म माझं!!!!! या गाववाल्यांच्या भानगडीमधे जो मुंबयकर पडेल ना तो येडझवा!!! मी मनात खूण बांधली.....

थोड्या दिवसांनी मी माझा पिलारला जायचा प्लान जाहीर केला. गुणामामाला जरा बाजूला घेऊन बाबांची फर्मायशही सांगितली.....

मामा कधी नव्हे तो गंभीर झाला.....
"तुजो बापूस म्हणजे जरा चक्रमच आसां रे!!! तुका लेकराक ह्या काम करूक सांगितलां? आणि ताई बरी तयार झाली!!!"
"नाय म्हणजे आई नुको म्हणा होती. तेंव्हा जर केलां नाय काम तर काय घरी जास्त ओरडो बसूचो नाय!!"
"तसां नको, बघू कायतरी मार्ग काढतंय!!", मामा म्हणाला....

दुसर्‍या दिवशी गुणामामा मला म्हणाला,
"अरे आसां कर, तुजो पिलाराक जावचो प्लान अगदी शेवटांक ठेव. मी तुका माझ्या फटफटीवरून घेवंन जातंय. तुझां पिलारचा काम करूयात, तुझ्या बापसाचो नेवेद्यही घेवयांत आणि मग मी तुका थंयसूनच लग्झरी गाडियेत बसवून दितंय थेट मुंबयसाठी!!! निदान एष्टीचे धक्के तरी बसूचे नाय तुका, जरा आरामाचो प्रवास होयत!!!"

मग सुट्टीच्या शेवटी आम्ही दोघं मामाच्या मोटारसायकलवरून पिलारला जायला निघालो.....

नेहमीचा मुंबय-पणजी हायवे सोडून गुणामामा तेरेखोलच्या दिशेन निघाला. मला रेडीचं बंदर दाखवून झालं. तिथून मॅगनीजचं खनिज वाहून नेणारी जहाजं दाखवून झाली. तेरेखोलचा किल्ला दाखवून झाला. मामा आणि त्याच्या सौंगड्यांनी (गुणामामा स्वातंत्र्यसैनिक होता!) तो किल्ला पोर्तुगीजांकडून लढून कसा मिळवला ती गोष्ट मला हजाराव्यांदा सांगून झाली.....

"पळाले रे शिंदळीचे, पळाले!!! साल्यांनी पाचशे वर्सां राज्य केलांन पण आमच्याबरोबरच्या एका दिवसाच्या लढाईत पळाले!!!", मामाच्या आवाजात सार्थ अभिमान होता.....

"पण आपल्या भारत सरकारान या किल्ल्याची कायसुद्धा काळजी घेवंक नाय रे!", मामा विषादाने म्हणाला, "बघ कसे चिरे ढासळतसंत समुद्राच्या पाण्यान!!! ह्यां नेव्हीचां एक चांगला आऊट्पोस्ट होवू शकलां नसतां काय? अरे पोर्तुगीज काय खुळे नाय होते या जागी किल्लो बांधूक! सात समुद्रविजेते ते!! म्हटलो तर समुद्रावर पण खुल्या समुद्रापासून सुरक्षित अशी जागा असां रे ही! पण आपले राज्यकर्ते सुक्काळिचे दिल्लीवाले!! तेंका समुद्राचा महत्त्व काय माहिती?"

"चल जावंदे!!"
"जावंदे तां झालांच!! कधीकधी आपल्या सरकाराची अशी करणी बघून असां वाटतां कि आमी ह्याच्यासाठीच लढलो काय?"

मी विषय बदलून मामाला परत मोटारसायकलीवर बसवलं. आमी पिलारला पोहोचलों! मी प्रिंन्सिपलसायबांचं पॅकेट त्यांच्या मित्राच्या हवाली केलं. त्यांना खूप आनंद झाला. आम्हाला जेवूनच जायचा आग्रह करीत होते. पण मामाचं मन काही तिथे लागेना.

"काय नायतर काय तरी बैल-डुकरां खावंक घालतीत आमका!!!", बाहेर पडल्यावर मामा मला म्हणाला....
"कायतरी काय मामा! किरिस्तांव झाले म्हणान काय झालां? तुझ्याइतकेच ते पण कोकणी आसंत!!! नुस्ते खावंक घातले आसते फक्त!!" मामा हसला....
"चल आता पणज्येक माझ्या मित्राकडे जावंया!! तुकां अशी मस्त मासळी खावंक घालतंय की तुझां कालिज झाल्यावर तू गोव्यातच येवंन रवशीत!!!"

आमी पिलाराहून पणजीला आलो. वाटेत पणजीच्या बाजारपेठेत मामा थांबला.

"ऊन बरांच झालांसा, जरा थोडी लिंबा घेवंन जावयां, मस्त लिंबाचा सरबत पिऊ जेवच्याआधी!" आम्ही एका लिंबवाल्याच्या गाडीकडे आमचो मोर्चा वळवला. मामाने एकेका हातात चार अशी आठ लिंबं घेतली. निरखून बधितली. नाकाशी धरून मस्त वासबीस घेतला.......

"काय हो? चांगली आहेत का ही लिंबं?", मागून आवाज आला. उच्चार अगदी स्वच्छ शहरी आणि सानुनासिक!! बघतों तो शर्ट-पँट घातलेला एक मधमवयीन माणूस. बहुदा मुंबय किंवा पुण्यातला चाकरमानी असणार. गोव्यात टूरिस्ट म्हणून आलेला!!! गुणामामाला लिंबाच्या क्वालिटीबद्दल विचारीत होता....

"त्यालाच विचारा", लिंबवाल्याकडे निर्देश करून मामा उत्तरला......
"त्याचं सोडा हो, मी तुम्हाला विचारतोंय, तुम्ही सांगा!!", ह्या शहरी लोकांना कुठे थांबायचं ते कळतच नाय!!!!!

मी गुणामामाकडे नजर टाकली, त्याचा चेहरा हिंस्र झालेला.....

"ही लिंबं ना! मस्तच आहेत!", दशावतारातल्या रावणाचा आवाज काढत मामा म्हणाला, "मूठ मारण्यासाठी मला फारच उपयोगी आहेत ही!!!! हॉ, हॉ, हॉ, हॉ, हॉ!!!!"

तो चाकरमानी जागच्या जाग्यावर झेलपाटला. त्याच्या धक्क्याने ती लिंबाची रास ढासळली.......
सगळी लिंबं रस्ताभर पसरली....
तो लिंबावाला त्या चाकरमान्याच्या पाठीमागे लागला....
आधी तो चाकरमानी त्या लिंबावाल्याचा मार खाणार, आणि नंतर त्याची बायको त्याचं बिरडं बनवणार.....

लिंबवाल्याच्या अंगावर घेतलेल्या लिंबांचे पैशे टाकत आणि पुन्हा दशावतारी हसत आम्ही आमच्या रस्त्याला लागलो.......

मामाच्या मित्राच्या घरी गेलो. लिंबाचं सरबत झालं, वहिनीने केलेलं मासळीचं जेवण झालं......
माऊलीच्या हाताला काही निराळीच चव होती. आजतागायत विसर नाय पडला त्या चवीचा!!!!

जेवण करून मुंबयची बस पकडण्यासाठी आम्ही बेतीच्या बसस्टँडावर आलो. आता पूल पडल्यापासून पणजीहून मुंबयच्या बसेस सुटत नायत, मांडवी नदी पार करून बेतीला यावं लागतं....
मामाच्या एका ओळखीच्या लग्झरीवर माझं तिकीट काढलं. बस सुटायला वेळ होता म्हणून जवळच एका झाडाखाली मला बसवून मामा "आत्ता येतंय!" म्हणून कुठेतरी गेला....

मासळीचं जड जेवण माझ्या डोळ्यांवर येत होतं! मी तिथेच जरा लवंडून डोळे मिटले......
मधेच जाग येऊन जरा डोळे किलकिले करून बघितलं तर दूरवर गुणामामा एका गावड्याच्या पोराशी कायतरी बोलत होता....

मी परत डोळे मिटले....

तासांभराने बसची वेळ झाली म्हणून मामाने मला जाग आणली. खिडकीच्या सीटवर बसवून दिलं आणि आपण बसच्या बाहेर उभा राहून माझ्याशी गप्पा मारू लागला....

"पुन्हा लवकर ये, आमकां विसरां नको! पुढल्या टायमांक तुझ्या आवशी-बापाशीकपण घेवंन ये!!!"
"हां मामा! अरे पन मामा, तां बाबांचा काम रवलांच!"
"हां तां नाय जमूक! तुझ्या बापाशीक सांग यावेळेस नाय जमूक म्हणां!! नंतर कधीतरी बघंया!!!!"

तितक्यात बस सुटली....

खिडकीतून येणार्‍या गार वार्‍यावर मी पुन्हा डोळे मिटले. प्रायव्हेट गाडी ती!!! सगळया एष्टी गाड्यांना धडाधड मागे टाकत पहाटेच्या वेळेसच मुंबईत येवून पोचली......

घरी पोहोचलो. आईला तिच्या माहेराची खबरबात दिली. आजीने धाडलेले सोलं, सुके बांगडे, तिरफळं वगैरे वस्तू तिच्या ताब्यात दिल्या. बाबांना त्यांचं काम जमलं नाय म्हणून सांगितलं. ते थोडेसे हिरमुसले पण काय बोलले नाय....

स्वच्छ आंघोळ करून आणि आईने केलेलं सांबारा-भात खाऊन जरा आराम करायला म्हणून पलंगावर आडवा झालो.....
तर तितक्यात दारावरची बेल वाजली.....

धडपडत उठुन दार उघडलं आणि माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना.......

तो पणजीला दिसलेला गावड्याचा पोर दारात उभा!!!!!

"गुणामामांन ह्या औषध दिलानीत पोचवूक!!!" माझ्या हातांत एक पिशवी देत तो आल्यापावली परतला...
"अरे जरा बस तरी!"
"नाय, माकां दमणाक जावंक व्हया!!!"
"काय रे, कोण आंसा?" चाहुल लागून बाबा पण बाहेर आले....

"गुणामामांन कायतरी पाठवल्यानीत!!", मी पिशवी उघडू लागलो तर काचेवर काच आपटल्याचा किण्-किण्ण आवाज आला!!!! बाबांचा चेहरा आनंदाने फुलला!!!!

"माकां वाटलांच! गुणा माकां निराश करूचो नाय!!! माझो भरवंशाचो वाघ आसा तो!!! मेव्हणो असूचो तर असो!!!" बाबांचा आनंद सोड्यावरच्या बुडबुड्यांसारखा ओसंडून जात होता.....

"वाघ तर खरोच", मी मनात म्हंटलं, "असल्या कामाचो आपल्या भाच्याक काय त्रास होवू नये म्हणान त्या वस्तूच्या किंमतीच्या दसपट गाडीभाडा भरून त्या गावड्याक एस्टीन (म्हणून तर तो माझ्यापेक्षा उशीरा मुंबईला पोहोचला!!!) पाठवून वस्तू तर घरपोच केली. एकीकडे आपल्या भावजींचो, थोरल्या बहिणीच्या घोवाचो, मान तर राखलो पण त्याचबरोबर आपलो भाचो सुखरूप पण राखलो....

"तुमचो मेव्हणो घाला आकाबायच्या चुलीत," मी बाबांना उघड म्हंटलं, "माझो मामा खरो भरवंशाचो वाघ आसां!!!!"



(डिस्क्लेमरः या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)

Saturday, January 10, 2009

अलीशिया - भाग ४

(पूर्वसूत्रः तोच चिरपरिचित आवाज आणि तेच खळखळून हसणं......)

"सो बडी! यू आर हियर ऍट लास्ट!!!!"
"वॉजन्ट इट रादर कंपल्सरी?", मी. अलीशिया पुन्हा खळखळून हसली....
"येस इट वॉज! एन्ड इट विल ऑलवेज बी इन द फ्यूचर!!!"

अलीशियाला माझ्या सोबत बसलेली पाहून वेट्रेस टेबलाशी आली.....

"अ ब्लडी मेरी ऍन्ड..."
"मला काहीही प्यायला नकोय!!", मी.
"ऍन्ड अ स्क्रू-ड्रायव्हर!!" माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत अलीशिया म्हणाली. व्होडका आणि संत्र्याच्या रसाचे मिश्रण असलेलं स्क्रू-ड्रायव्हर हे माझं एकेकाळचं अतिशय आवडतं ड्रिंक!!! इतक्या वर्षांनंतरही ते तिच्या अजून लक्षात होतं....
"आणि तू माझ्या सेक्रेटरीला ते डिकीबद्द्लचं कशाला सांगितलंस? तिच्या डोक्यात काही वेगळ्याच कल्पना सुरू झाल्या, माहितेय?"
"ती जास्त नखरे करायला लागली म्हणून सांगितलं! ओ, नेव्हर माईंड हर!! सेक्रेटर्‍यांना आपले बॉसेस कधीकाळी चावट असलेले आवडतात!!" आता माझं बोलणंच खुंटलं...

"बरं ते जाऊदे! फर्स्ट, गिव्ह मी अ बिग हग!!" मला मिठी मारत ती म्हणाली, "आय मिस्ड यू सो मच!!"
"सो डिड आय!!", मी.
"खोटं बोलू नकोस! इतक्या वर्षांत कॉन्टॅक्ट पण नाही ठेवलास!! आत्ता मलाच तुला शोधून काढावं लागलं!!! बाकी यू हॅव् गेन्ड वेट! जाडा झालास! केसही पिकले कानशिलाजवळ!! डॉक्टर झालास म्हणे!!! डोक्याने पण मॅच्यूअर झालास इतक्या वर्षांत, की अजूनही आहे तसाच वात्रट आहेस?"
"बाई गं, एका मुलाचा बाप आहे मी आता!"
"डज दॅट मेक पीपल मॅच्यूअर? आय डिडंन्ट नो!!" मला एक टोला हाणत ती म्हणाली, "माझ्या नेफ्यूचा फोटो कुठाय?" मी माझ्या मुलाचा फोटो काढून दाखवला....
"ओह! सो स्वीट!! तुझी अजून तीच बायको आहे का ते विचारणार होते पण याला बघून ते विचारायची गरजच भासत नाही!! बाकी त्याचा चेहरा आईच्या वळणावर गेलाय तेच बरं!!" अजून एक टोला...

"तू मात्र फारशी बदललेली दिसत नाहीस!!"
"त्याचं कारण माझी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी!!", माझी फिरकी घेत अलीशिया म्हणाली....
"हो ना! तुझ्या रहाणीला साधी म्हणणं म्हणजे आम्ही दारिद्र्यरेषेखालीच जीवन जगतोय!!!" मी टोला परतवला.
"आणि कॉस्मेटिक्सची मेहेरबानी!! ते जाऊदे! मला सांग तुझी स्टोरी!! काय काय केलंस गेल्या पंधरा वर्षांत!!"

मी माझी स्टोरी सांगितली. स्टोरी काय असणार! जॉब आणि करियर!! दर तीन चार वर्षांनी वरची पोझिशन आणि नवीन शहर!!

"माझं जाऊदे! तू काय करतेस ते सांग!!"
"मी ना! आमचं नेहमीचंच!! ज्युवेलरी आणि प्रेशियस स्टोन्स!!!"
"डॅडी कसे आहेत तुझे?"
"अरे डॅडी वारले सहा वर्षांपूर्वी!!"
"ओ! आय एम सॉरी!"
"थँक्स! त्याआधी दोन्-तीन वर्षे ते आजारीच होते! गेली आठ्-नऊ वर्षे मीच संभाळतेय सगळा बिझिनेस!!"
"अजून नफ्यात चालला आहे का बिझिनेस?", मी मघाचा टोला परतवला...
"शट अप!!! मी एक्सपांन्ड केलाय बिझिनेस!! ईस्टर्न युरोप, जपान, मिडल-ईस्ट आणि हो तुमच्या मुंबईतही!! युवर न्यू अप्पर मिडल क्लास!!!"

"बरं, मला कशाला इथे बोलावलंस?"
"लेट्स गो टू अवर स्वीट!", अलीशिया उभी रहात म्हणाली, "मी जेवणही तिथेच मागवलंय. मला तुझ्याशी काही बोलायचंय! आणि मुख्य म्हणजे तुला काही दाखवायचंय!!!"

मी तिच्या पाठोपाठ निघालो. नेहमीच्या लिफ्टसकडे न जाता ती एका वेगळ्याच लिफ्ट्कडे गेली. डायरेक्ट पेन्टहाऊसला जाणारी लिफ्ट होती ती! तिने तिच्याकडच्या ऍक्सेस कार्डाने ती उघडली! आतमध्ये बाकी मजल्यांची बटनं नव्हतीच!! डायरेक्ट ऐंशी मजल्यांच्या वर असलेलं पेंन्टहाऊस!!!

"वॉव!! एकदम पेन्टहाऊस हं!", मी उदगारलो....
"अरे काही नाही!!", काही विशेष नसल्यासारखा हात झटकत ती म्हणाली, "डॅडींना हे पेंटहाऊस खूप आवडायचं!! ते सान-फ्रान्सिस्कोत आले की नेहमी इथेच उतरायचे!!! ह्या हॉटेलचे प्रिफर्ड गेस्ट होते ते!!! त्यांच्यानंतर मग मी ते तसंच चालू ठेवलं! होटेल मॅनेजमेंटचा पण खूपच आग्रह पडला!!!!"
"अरे वा! बरी चांगली दिसतेय की मॅनेजमेंट!! जुने संबंध सांभाळतेय!!!"
"आणि त्यांचे ढीगभर शेअर्स माझ्याकडे आहेत!! दॅट हेल्प्स टू!!", पुन्हा ते खळखळून हसणं...

आम्ही तिच्या पेंटहाऊसमध्ये शिरलो. सेरानंच आमचं स्वागत केलं. पुन्हा तिचं ते खास अमेरिकन पद्धतीचं स्वागत! पण यावेळी मला त्यात खूप आपुलकी जाणवली!!!

"अरे केव्हढा मोठा झालास तू? बाहेर कुठे भेटला असतास ना तर ओळखलंच नसतं मी तुला!!!", सेरा.
"मोठा कसला, म्हातारा झालाय तो गाढव!!!", इति अलीशिया....
"असू दे! पुरूष मोठे झाले की भारदस्त दिसतात, मला आवडतं!!", सेरा.
"पण सेरा, तू मात्र इतक्या वर्षात अधिकच सुंदर दिसायला लागली आहेस!!", मी खरं ते सांगितलं
"तुमचा दोघांचा काय हातात हात घालून पळून जायचा प्लान आहे का?", अलीशिया वदली, "असेल तर आत्ताच जा! येणारं चवदार जेवण तरी मी एकटीच पोट भरून खाईन!!!"

"ए, तू गप गं!", मी तिला चापलं, "सेरा, काय करतेस तू?"
"तुला आठवतंय, ते टेनेसीमधलं रॅन्च आणि ते हॉर्स-ब्रीडींग? ते सगळं मी संभाळते!!", सेरा.
"रियली? वॉव!!"
"अरे काही नाही!", सेराच्या कुल्यावर एक चापटी मारत अलीशिया म्हणाली, "अरे हिला काही काम-धंदा करायला नको!! तिथे टेनेसीत रहाते मस्त हवेत आणि हाताखालच्या नोकरांवर सत्ता गाजवते!!! आणि सांगते म्हणे मी घोडे पाळते!!!"

सेरा समजूतदारपणे खुद्कन हसली...

अलीशियाने तिला काही खूण केली आणि सेरा आत गेली. तिची पाठ वळल्यावर अलीशिया मला गंभीरपणे म्हणाली,

"अरे नाही रे! खरं म्हणजे तिला घोड्यांची भीती वाटते. पण माझ्यासाठी ती बिचारी सगळं करते. तुला माहिती आहेच, हे रॅन्च आणि घोडे हे माझं स्वप्न होतं, तिचं नव्हे. पण मला तर या ज्युवेलरी बिझिनेसमधून डोकं वर काढायला उसंत मिळत नाही. म्हणून माझं स्वप्न पुरं व्हावं म्हणून ती धडपड करतेय!!"
"ओह! दॅट्स सो नाईस ऑफ हर!!"
"येस! आता आमच्या घरात आय वेअर द पॅन्टस!!! मी बिझिनेस संभाळते आणि सेरा सर्व घरं आणि प्रॉपर्टीजची देखभाल करते!!! धिस हॅज बीन गोईंग ऑन फॉर द लास्ट फिफ्टीन इयर्स!!"

"बरं, तू काय दाखवणार होतीस मला?"
"येस दॅट!.... सेराऽऽऽ!!!" अलीशियाने हाक मारली.....

सेरा बाहेर आली. पण ती एकटीच नव्हती. तिच्याबरोबर एका बाबागाडीत झोपलेली एक वर्ष्-दीड वर्षांची मुलगी होती. अतिशय गोड चेहरा, भरपूर केस आणि वर्णाने सावळी एशियन! मधूनच झोपेत खुद्कन हसत होती तेंव्हा अजूनच सुंदर दिसत होती.....

"हे काय? हे प्रेशियस ज्युवेल कुठून आणलंस?"
"कशी आहे?"
"मस्तच!! अगदी स्वीट आणि चार्मिंग प्रिंन्सेस!! पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस?"

"अरे तुला माहिती आहेच की बिझिनेसच्या निमित्ताने आमचे मलेशिया-थायलंड-इंडोनेशियाबरोबर पूर्वीपासून कॉन्टॅक्टस आहेत, अगदी डॅडींच्या काळापासून! आमचं खूप जाणं-येणंही आहे तिथे. गेल्या २००४ च्या भूकंपात आणि त्सुनामीत तिथे खूपच वाताहात झाली. तेंव्हा त्या लोकांना मदत म्हणून आम्ही तिथे बिझिनेस कॉन्टॅक्ट असलेल्या लोकांनी निधी उभारून मदतकार्य सुरू केलं होतं. त्या निमित्ताने मी आणि सेराने तिथल्या मदतकेंन्द्रांना बर्‍याच आणि वारंवार भेटी दिल्या होत्या. निधी व्यवस्थित वापरला जातोय की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी!"

"बरं मग, ही मुलगी?"

"ही तिथल्या एका अनाथकेंद्रात आली होती. हिचे आई-बाप त्सुनामीत वाहून गेले. ही एका प्लास्टिकच्या पाळण्यात होती म्हणून तरंगत गेली आणि अतिशय आश्चर्यकारकरित्या वाचली. तिला तिथे अनाथालयात भरती केलं गेलं होतं. मला आणि सेराला पाहताक्षणीच ही खूप म्हणजे खूपच आवडली."

"म्हणून तू तिथनं हिला उचलून आणलीस?", मनात म्हटलं ह्या बयेचा काही भरवसा नाही.....

"अरे तसं नाहीरे!! आमच्या रिलेशनशिपमध्ये अलिकडे सेरा वॉज अल्सो अनहॅपी दॅट वुई डिडन्ट हॅव अ चाईल्ड!! आता आमच्या रिलेशन्शिपमध्ये आमच्या दोघांचं एक मूल कसं असणार? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घेता येतं आणि आम्ही सेरासाठी तसाच विचार करत होतो. पण तेव्हढ्यांत ही भेटली....."

"मग?"

"मग मी सेराला म्हटलं कि बघ, कुठूनतरी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घेण्यापेक्षा ही आपल्या दोघींनाही आवडलीय! तिलाही कोणी नाहिये! तेंव्हा आपणच तिला दत्तक घेऊ या का? कमीतकमी एका जीवाचे तरी क्लेश कमी होतील!!! थोड्याफार समजवण्याने तिलाही ते पटलं. मग आम्ही तिथे जाऊन तिला रीतसर दत्तक घेतलं."

"दॅट्स सो नाईस!!"

इतक्यात ती मुलगी झोपेतून उठली आणि कुरकुर करू लागली. सेराने तिला उचलून कडेवर घेतलं. आता तिचे डोळे मला दिसले. अगदी काळेभोर होते. खुपच क्यूट होती ही मुलगी!!!

मी तिला घेण्यासाठी तिच्यासमोर हात केले. आणि ती लबाड सरळ आली की माझ्याकडे!! काही ओळख वगैरे गरज लागली नाही तिला! अलीशिया आणि सेरा एकमेकींकडे पाहून हसल्या...

"सो यू आर अ फॅमिली नाऊ! कॉन्ग्रॅच्यूलेशन्स!!!!", मी.
"दॅट्स द थिंग!! दॅट्स व्हेअर वुई नीड युवर हेल्प!!!"
"माझी काय मदत हवी?"
"अरे दिसत नाही का तुला? ही मुलगी ईंडियन ओरिजिनची आहे. शी इज नॉट ईंडियन बट ऑफ ईंडियन ओरिजिन!! हर पेरेन्टस वेअर फ्रॉम इंडोनेशिया, द बाली आयलंड!! दे वेअर बाली हिंदूज!!! आम्ही काही ख्रिश्चन नाही करणार तिला पण तिला तिची हेरिटेज कशी शिकवणार आम्ही? ती आमच्यापेक्षा दिसायला इतकी वेगळी आहे की तिला समजूत येताक्षणी कळणारच! त्यामुळे ती आमची दत्तक मुलगी आहे हे तिला लवकरच सांगून टाकणं क्रमप्राप्त आहे. ते आम्ही करूच पण तिला तिच्या ईंडियननेसबद्दल, हिंदूईझमबद्दल काय शिकवू शकणार आम्ही?"

"मग तुम्हाला माझ्याकडनं काय मदत हवी? टेनेसीमधल्या इंडियन टेंपलचा पत्ता?", मी.

"हॅ हॅ, काय पण बोललास! तुझं काय डोकं आहे का खोकं? अरे तो पत्ता मी ही शोधून काढू शकते! इन फॅक्ट नॅशव्हिलच्या टेंपलला आम्ही जाऊन सुद्धा आलो आहोत. पण हिच्या जीवनात कोणीतरी तिचं इंडियन आणि हिंदू असं आपलं माणूस नको का?"

"बरं मग तुझं काय म्हणणं?"

"आमची दोघींची अशी इच्छा आहे की तू आणि तुझी पत्नी यांनी तिचं गॉड-पेरेन्टस व्हावं!!!"

"अरे बापरे! गॉड पेरेन्ट्स?", मी एकदम गडबडूनच गेलो. शॅम्पेन, स्क्रू-ड्रायव्हर सगळ्या एकदम झरझरा खाली उतरल्या.....

"का? काय अडचण आहे तुला?"

"एक अडचण? अगं अनेक अडचणी आहेत!!!! एक म्हणजे हिंदू लोकांत बाप्तिस्मा नसतो त्यामुळे गॉड पेरेन्टसही नसतात. दुसरं म्हणजे मी काही प्रॅक्टिसिंग हिंदू नाहीये. तिसरं, मला माझ्या पत्नीला विचारायला नको का? चवथं म्हणजे ही आयुष्यभराची कमिटमेंट आहे!! हा काय भातुकलीचा खेळ आहे का?"

पण ती मार्केटिंग मास्टर अलीशिया होती. तिने माझ्या या सर्व संभाव्य प्रश्नांवर अगोदरच विचार करून ठेवला होता.....

"हे बघ, हिंदू लोकांत तसे गॉड पेरेन्ट्स नसतात हे मलाही माहितीये. मी तिला तिच्या हेरिटेजचं जिवाभावाचं माणूस या अर्थाने म्हणतेय! तू प्रॅक्टिसिंग हिंदू नाहियेस हे मला पूर्वीपासूनच माहिती आहे. पण तुझं त्या विषयावर वाचन आहे हेही मी पूर्वी पाहिलंय!! होय, तुला तुझ्या पत्नीला विचारायला पाहिजेच, मी कुठं नाही म्हणतेय? जातांना हिचे फोटो घेऊन जा आणि तिला दाखवून विचार! आणि हा खेळ नसून आयुष्यभराची कमिटमेंट आहे हे मलाही कळतंय! म्हणून तर नुसतं फोनवरून न बोलता तुला इथे बोलावलं!! आणि तुम्ही आत्ता तुमच्या मुलाला वाढवता आहांतच ना!! मग ही तुमची आणखी एक मुलगी समज!!" तिचा युक्तीवाद बिनतोड होता...

"अगं पण! मी इथे वेस्ट्-कोस्ट्ला आणि तुम्ही टेनेसीत इस्ट्-कोस्ट्ला! हे जमणार कसं? मी पट्कन उठून येणार कसा?"

"आज कसा आलांस? तसाच!!", आता तिच्या आवाजाला धार आली होती...

मी पुन्हा त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. खरंच मोहात पडण्यासारखीच होती...

"हे बघ, मला विचार करायला जरा वेळ दे! मला माझ्या पत्नीशी चर्चा करु दे...", मी.

"जरूर! आम्ही कुठं नाही म्हणतोय! तू जरूर विचार कर, तिचे फोटो घेऊन जा, तू आणि तुझी पत्नी यावर चर्चा करा, तुमच्यावर हिची काहीही फिनान्शियल जबाबदारी नाहिये याची तिला कल्पना दे, आणि मग आम्हांला कळव!!"

आवाज थोडा सॉफ्ट करत अलीशिया पुढं म्हणाली, "हे बघ, हे काहीसं ओव्हरवेल्मिंग वाटु शकतं याची मला कल्पना आहे. पण आमच्यासमोर तिच्या हेरिटेजचा, प्रेमळ, आणि ही रिलेशनशिप समर्थपणे आणि निस्वार्थीपणे पार पाडू शकेल असं तुझ्याशिवाय दुसरं कोणीहि नाही. मी तुझे अगदी उपकार मागतेय, आणि मला उपकार मागायला अजिबात आवडत नाही! तेंव्हा प्लीज, प्लीज, नाही म्हणू नकोस!!" तिचा आवाज गहिवरून आला होता....

सेराने तिला जवळ घेतलं. पण आज माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. माझी नजर त्या मुलीवर खिळली होती. मी पुढे होऊन पुन्हा तिला कडेवर घेतलं....

"बाय द वे, वुई हॅव नेम्ड हर रूबी!!!"
"रूबी?", मी हसलो...
"व्हाय? व्हॉट्स द मॅटर?"
"काही नाही!! प्रेशस स्टोन्समध्ये दिवसरात्र काम करून तुझी कल्पनाशक्तीही गंजल्येय!!!"
"मग तू इंडियन नांव ठेव तिला!! पण इकडच्या लोकांना उच्चारता येईल असं ठेव!!!"

मी त्या मुलीकडे एकटक बघत होतो. आणि माझ्या तोंडून नकळत शब्द निघून गेले....

"शिल्पा! हिचं नांव शिल्पा!!!"
"शिल्पा? व्हॉट डज दॅट मीन?"
"शिल्पा मीन्स द वन हू इज लाइक अ स्कल्पचर!! मेन्ली रिफर्ड टू सम्थिंग व्हेरी ब्यूटिफूल ऍन्ड आऊट्स्टँडिंग!! लाईक स्टॅच्यू ऑफ अ गॉड ऑर अ गॉडेस!!"

"ओ, आय लव्ह दॅट नेम! ऍन्ड इट्स मीनींग टूऽऽ!!!!!" सेरा चित्कारली....
"डिडंन्ट आय टेल यू?" माझ्याकडे कौतुकाने पहात अलीशिया तिला म्हणाली, "ही इज द राईट वन!!!"

............

............

परतीचा प्रवास करून मी घरी आलो. प्रवासभर डोक्यात अलीशिया, सेरा आणि शिल्पाचेच विचार होते. घरी आल्यावर मध्यरात्रीपर्यंत जागून बायकोला ही सगळी स्टोरी सांगितली. ती अलीशियाला चांगलीच ओळखत असल्याने ती फारशी आश्चर्यचकित झाली नाही. तिला शिल्पाचे फोटो दाखवले. तिलाही शिल्पा खूप आवडली. आपल्याला तिचे धर्मपालक व्हायला मिळण्यात आपलाच सन्मान आहे ते तिनेच (उलट) मला पटवून दिलं. पोरगं तर शिल्पाचे फोटो घेऊन "माय न्यू सिस्टर!!!" ओरडत घरभर धावत सुटलं.....

आमचा निर्णय झाला होता! मध्यरात्रीच मी फोन उचलला, नंबर फिरवला....

त्या दोघी जाग्याच होत्या.....

"द आन्सर इज यस!!"

क्लिक...

यावेळी तिच्या हाय-बायची वाट न पहाता मीच फोन ठेवून दिला.....

उशीवर डोकं टेकून मी डोळे मिटले. माझ्या बदललेल्या आयुष्याला आता सुरवात झाली होती.....

माझ्या पत्नीने मला मुलगा दिला.......

आणि आता या माझ्या जिवलग मैत्रिणीने मला तिची मुलगी दिली......

माझं आयुष्य आता परिपूर्ण आहे! मी पूर्ण कॄतार्थ आहे!!

(संपूर्ण)

(वरील कथेतील व्यक्ती काल्पनिक असून कुणाशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)

अलीशिया - भाग ३

(पूर्वसूत्रः "आय लाईक यू", माझ्या पाठीवर जोरदार थाप मारत अलीशिया उद्गारली, "वुई आर गोईंग टू बी व्हेरी गुड फ्रेंन्डस!!!"
तिची बत्तिशी अगदी पुरेपूर खरी ठरली होती.....)

जसजसे दिवस जात चालले तसतशी मला तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती होत होती. काही तिच्याकडून पण बरीचशी माझ्या बाकीच्या सहध्यायांकडून.....

अलीशिया गर्भश्रीमंत होती. तिचे वडील हे पेशाने जवाहिरे होते. त्यांचा व्यापार फक्त अमेरिकेतच नव्हे तर बँकॉ़क, हाँगकाँग, ऍन्टवर्प असा जगभर पसरला होता. जगभर फिरती चालायची त्यांची! भारतातही त्यांचे क्लायंट्स होते म्हणे! सुरतेतल्या खड्यांना पैलू पाडणार्‍या कारागिरांशीही त्यांचे कॉन्टॅक्टस होते....
तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती. ती प्रसिद्ध बिडनहार्न कुटुंबाच्या वंशजांपैकी होती. हे कुटुंब म्हणजे ज्यांनी डेल्टा एअरलाईन्स आणि कोकाकोला सारख्या कंपन्या स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता त्यापैकी....
त्यांचे या दोन्ही कंपन्यामध्ये ढीगभर शेअर्स होते. त्यातलेच काही (म्हणजे भरपूर!) अलीशियाच्या वाट्याला वंशपरंपरेने आलेले होते....

इतर बर्‍यापैकी सधन असलेल्या सुंदर मुली कॉलेजात रोज वेगवेगळे ड्रेसेस घालून जातात. पण अलीशिया मात्र रोज निरनिराळे दागिने घालून यायची. एकदा घातलेला दागिना पुन्हा रिपीट नसायचा! इतर मुलींचा नुसता जळफळाट व्हायचा!!! आता मात्र पहिल्या दिवशी तिच्या कानातले डूल हे खर्‍या हिर्‍यांचेच होते याविषयी माझ्या मनात काही संदेह उरला नव्हता...

आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न अलीशियाचं कौटुंबिक जीवन मात्र फारसं सुखावह नव्हतं. तिच्या बापाने हिची आई वारल्यावर दुसरं लग्न केलं होतं. ती सावत्र आई हिला फारसं नीट वागवत नव्हती.....

"यू वोन्ट बिलीव्ह", अलीशिया मला एकदा म्हणाली होती, "अदर चिल्र्डेन क्राय व्हेन दे आर सेन्ट टू द बोर्डिंग स्कूल! आय वॉज सो हॅपी!!!!"
"व्हाय?"
"आय वॉज जस्ट फेड अप विथ माय स्टेप-मदर्स ऍट्रोसिटीज!!"
"डिड युवर फादर लाईक युवर गोईंग टू द बोर्डिंग स्कूल?"
"नो, ही डिडंन्ट! बट ही कुड्न्ट से एनिथिंग टू माय स्टेपमॉम!! पुअर गाय!!!!" तिला बापाविषयी राग असायच्या ऐवजी करूणाच होती....

पाचवीपासूनचं शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये करून अलीशिया युनिव्हर्सिटीत गेली. भूगर्भशास्त्रात बॅचलर करून तिने प्रेशियस स्टोन्स हे स्पेशलायझेशन घेऊन मास्टर्स डिग्री मिळवलेली होती. आता आमच्याबरोबर एम्.बी.ए. करत होती.

'ही सगळी डॅडींची इच्छा!" मला एकदा म्हणाली होती, "मला खरं तर अक्वेस्टेरीयन सायन्समध्ये जायचं होतं!!"
"रियली?"
"हो, मला घोडे खूप आवडतात. मला घोडे पाळणं आणि अस्सल घोड्यांची पैदास करणं यात खुप इंटरेस्ट आहे"
"तुला काय बाई, सहज साध्य आहे ते! तू श्रीमंत आहेस! घेशील एखादं हॉर्स-रँन्च कुठेतरी"
"कुठेतरी घेशील नव्हे, मी टेनेसीमध्ये एक पाचशे एकरांचं रँच घेतलंही आहे. सध्या त्यावर केबिन (जंगलातील घर) बांधायचं काम सुरू आहे" तिने मला एक अर्धवट बांधकाम झालेल्या पण प्रशस्त आणि आलिशान केबिनचा फोटो काढून दाखवला...

"पण डॅडी म्हणतात हे घोडे वगैरे सगळं एक छंद म्हणून ठीक आहे, पण खरी करियर हवीच!!!"
"मग काय चुकलं? बरोबरच आहे तुझ्या डॅडींचं!"
"तुम्ही सगळे पुरुष म्हणजे एकदम हावरटच असता! असा कितीसा पैसा लागतो जगायला?"
"मला फारच कमी लागतो गं!", मी. "तुझा एक दागिना विकलास ना तरी माझं त्याच्यात वर्षानुवर्ष भागेल!!"
"यू आर सो सिली!!!", माझ्या डोक्यावर एक टप्पल मारत ती म्हणाली....

आमचं आमच्या प्रोजेक्टवर काम सुरूच होतं. आम्ही आम्हाला नकळतच निरनिराळे रोल घेतले होते. एका मुलीचं काम लायब्ररीत जाऊन माहिती गोळा करण्याचं. दुसरीचं ती माहिती वाचून त्यातली आम्हाला उपयुक्त असलेली माहीती बाजूला काढणं. माझं गणित (इतरांच्या मानाने) चांगलं असल्याने फायनान्शियल ऍनेलेसिस करण्याचं काम माझ्याकडे आलं. अलीशिया मला ग्रूपचा "स्पॉक" म्हणायची. अलीशियाची स्पेशालिटी म्हणजे मार्केटींग! तिच्या त्या सोनेरी डोचक्यातून अशा काही भन्नाट कल्पना निघायच्या की आम्ही आश्चर्यचकित होउन जायचो.....

शेवटी आमच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनचा दिवस येऊन ठेपला. मार्केटिंग मास्टर अलीशिया ही ग्रूपतर्फे प्रेझेन्ट करणार होती. तिला लागेल तो फिनान्शियल डेटा पुरवायचं काम माझ्याकडं होतं. मी तिच्या स्टेजच्या मागे एका खुर्चीवर बसलो होतो आणि तिला लागेल तशी महिती पुरवत होतो. दुसर्‍या एका पाच जणांच्या टीमला आमच्या प्रोजेक्टवर टीका करायचं काम होतं.....

त्या दिवशी अलीशिया एकदम नटून सजून आली होती. नेहमी ती शर्ट्-पँन्ट घालायची. आज मात्र ती सूट घालून आली होती, अगदी स्टॉकिंग्जसकट!!! काळ्या रंगाचा तो ड्रेस तिला अगदी खुलून दिसत होता. पेन्सिल स्कर्ट आणि लो कटच्या ब्लाऊजमध्ये तिचं सौंदर्य अगदी उजळून उठलं होतं. त्यातच तिचे ते दागिने...

"अलिशिया इज लुकिंग व्हेरी ब्यूटिफूल टुडे!!" मी कौतुकाने माझ्याबरोबरच्या मुलाला, जिमला, म्हणालो.
"येस! गॉडस डॅम्न क्रुयेल जोक!!!" तो तंद्रीत असल्यासारखा म्हणाला...
"व्हॉट? व्हाय डू यू से सो?" मी चमकून त्याच्याकडे पाहिलं....
"नथिंग! नेव्हर माईंड!!!" तो चपापला...

तितक्यात प्रेझेन्टेशन सुरु झालं. अलिशियाने मस्तच प्रेझेन्टेशन केलं. प्रतिस्पर्धी टीमच्या प्रश्नांनाही तिने सडेतोड उत्तरं दिली. तिला लागेल तो फिनान्शियल डेटा तिच्या पाठीमागे बसून मी पुरवत होतो. त्यावर झर्रकन एक नजर टाकून ती विचारलेल्या प्रश्नांचं व्यवस्थित खंडन करत होती. आमचं टीमवर्क मस्त जमून आलं होतं....

प्रेझेन्टेशन संपलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमच्या ग्रूपचं अभिनंदन केलं. प्रोफेसरांनीही आमच्या कामगिरीचं कौतुक केलं...
"वेल डन, अलीशिया!", मी तिचं अभिनंदन केलं...
"कुडंन्ट हॅव डन विदाऊट यू, मिस्टर स्पॉक!!", तिने सगळ्या वर्गासमोर माझा गालगुच्चा घेतला. आख्खा वर्ग हसला. आता उरलेल्या सेमेस्टरसाठी माझं नांव ठरलं होतं.....
"व्हॉट आर यू डुइंग टुनाईट?", अलीशियाने मला विचारलं
"नथिंग! आय विल बी इन माय अपार्टमेंट!!"
"फरगेट युवर रूम! आय वॉन्ट टू टेक यू आउट फॉर डिनर. यू हेल्प्ड मी अ लॉट टुडे ड्युरिंग द प्रेझेंन्टेशन"
"ओह! थँक यू!"
"बी रेडी बाय सिक्स ओ क्लॉक!! आय विल पिक यू अप!!" माझ्याकडे पाठ फिरवून अलीशिया चालत सुटली.

तिला पाठमोरं पहात रहाणं आज जास्तच सुखावह होतं! तिच्या पेन्सिल स्कर्ट्मुळे!!!!!!

चार-साडेचारच्या सुमाराला अलीशियाचा फोन आला....
"यू वोन्ट माईंन्ड इफ माय फ्रेंन्ड जॉईन्स अस फॉर डिनर, डू यू?", अलीशिया.
"आय ऍम फाईन विथ इट'

क्लिक...
फोन बंद झाला...

बरोबर सहा वाजता खाली पार्किंग लॉटमध्ये अलीशियाच्या गाडीचा हॉर्न वाजला. मी गाडीत बसल्यावर तिने फर्रर्रर्र आवाज करत गाडी रस्त्याला लावली....
"आपण कुठे जातोय जेवायला?" माझ्या पोटात शंका! आता कुठलं अमेरिकन फूड खायला लागतंय, देव जाणे!!!
"वी आर गोईंग फॉर ईतालियन फूड", चला, देव पावला, काय नाय तर तिथे पिझ्झा तरि खाता येईल!!!
"व्हेअर इज युवर फ्रेंन्ड?"
"शी विल जॉईन अस इन द रेस्टॉरंट!!"

गावाबाहेर असलेल्या एका महागड्या इटालियन हॉटेलापाशी गाडी थांबली. मी हे हॉटेल अनेकदा पाहून (अर्थातच बाहेरून!!!) त्याचं मनातल्या मनात कौतुक केलं होतं....
आत जाण्याचा प्रश्नच नव्हता! तिथल्या वेटरला माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळत असावेत!!!

आम्हाला तिथल्या होस्टेसने स्थानापन्न केल्यावर विचारलं, "व्हॉट वुड यू लाईक टू ड्रिंक?"
"वॉटर", मी सांगितलं. अलीशिया खळखळून हसली....
"नॉट दॅट, डमी! शी इज आस्किन्ग अबाऊट द वाईन!!"

त्या विषयात आमचा सगळा आनंदीआनंदच होता. तोपर्यंत मी प्यायलेली वाईन म्हणजे आमच्या गोव्याची पोर्ट वाईन! ती हिथे मिळते का ते माहिती नव्हतं.....

शेवटी अलीशियानेच इटालियन कियान्टीची ऑर्डर दिली. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आता तिने लिंबाच्या पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि काळ्या रंगाची पँट! केस मोकळे सोडले होते....

तितक्यात...

"हाय सेरा!", अलीशियाने हाक मारली....
ती मुलगी चटकन पाठीमागे वळून आमच्याकडे पाहू लागली. नजरेत ओळख पटून आमच्या टेबलापाशी येऊ लागली. मी तिच्याकडे थक्क होऊन पहात होतो.....
पाच फूट ऊंची, अलीशियासारखीच गोरी पान, पिवळे धम्मक सोनेरी केस पाठीपर्यंत आलेले, अतिशय पातळ आणि नाजूक बांधा आणि निळेभोर डोळे!!!! इतके गडद निळे डोळे मी त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी पाहिले नाहीयेत! प्रशान्त महासागराच्या खोल पाण्याप्रमाणे!! त्यात आपण सरळ बुडून मरावं अशी इच्छा आपल्या मनात उत्पन्न करणारे!!! एखादी मॉडेल किंवा चित्रतारका असावी अशी पर्सनॅलिटी!!!!

"आयला, या अलीशियाच्या मैत्रिणीपण तिच्यासारख्याच एकसे एक देखण्या दिसतायत!!", मी आपला मनातल्या मनात!!!!

सेरा आमच्या टेबलापाशी आली. अलीशियाने तिची माझ्याशी ओळख करून दिली. सेराने अमेरिकन पद्धतीप्रमाणे माझ्या गालाला गाल लावून मला विश केलं. मग अलीशियाच्या शेजारी बसून तिचं दीर्घ चुंबन घेतलं....

नंतर मला त्या मेजवानीतलं फारसं काही आठवत नाही....
कियान्टी वाईन मस्त होती, जेवणही झकास असावं.....

मला फक्त आठवतं ते एका प्रणयी युगुलाचं हितगुज! दोघी एकमेकींना चिकटून बसल्या होत्या, एकमेकींना वारंवार कवळत होत्या....
माझ्या नजरेसमोर लहानपणी गावी पाहिलेली उन्हांत खेळणारी दोन पिवळ्या धम्मक नागांची जोडी दिसत होती! एकमेकांना विळखा घातलेली!!!
इथे फरक फक्त इतकाच की या नागिणी होत्या! पण तशाच पिवळ्याधम्मक- सोनेरी केसांच्या!!!!!
सकाळी जिम ने काढलेल्या उद्गारांचा अर्थ मला आत्ता कळत होता!

अलीशिया लेस्बियन होती!!!!!!!!!

पुढ्ली सर्व संध्याकाळ मी गप्पच होतो. जेवण संपल्यावर सेरा निघून गेली. अलीशिया मला तिच्या गाडीतून माझ्या अपार्टमेंटपर्यंत सोडायला आली. गाडीतही आम्ही गप्प होतो. अर्धी वाट संपल्यानंतर अलीशियाच म्हणाली,

"सो हाऊ आर यू फिलींन्ग? आर यू शॉक्ड? आर यू ऍन्ग्री विथ मी?"
"ओह, सो मेनी क्वेश्चन्स, सो लिटल ब्रेन!!" मी हसून तिला चिडवलं. मला हसलेला पाहून ती ही हसली. मनावरचं खूप मोठं दडपण उतरल्यासारखी...
"सो, हाऊ ऍम आय फिलिंग?, आय ऍम ऑल राईट मॅडम! ऍम आय शॉक्ड? येस ऍब्सोल्यूटली!! मी ज्या देशातून आणि समाजातून आलोय तिथे गे कपल्स तर सोडाच पण स्ट्रेट कपल्सही असं पब्लिक प्लेसमध्ये एकमेकांना आवळत- चिवळत नाहीत. आम्ही त्या बाबतीत बरेच ऑर्थोडॉक्स आहोत. मी तुझ्यावर रागावलोय का? नाही! मला तुझा मुळीच राग आलेला नाही"
"मोस्ट मेन डू गेट ऍन्ग्री", ती मॅटर-ऑफ-फॅक्टली म्हणाली.
"लुक अलीशिया, यू आर माय फ्रेंन्ड! आय ट्रीट यू ऍज माय फ्रेंन्ड! तुझं सेक्स्चुअल ओरिएंटेशन काय आहे याला माझ्या दृष्टीने फारसं महत्त्व नाही. तुझ्या सौंदर्याचं मला जरूर कौतुक आहे पण तुझ्याविषयी मला अभिलाषा नाही. मला माझी स्वतःची फियान्सी भारतात आहे"
"रियली? यू आर एंगेज्ड? डू यू हॅव हर पिक्चर? शो मी! शो मी!!!!" अलीशिया चित्कारली. मी माझ्या पाकिटातून फोटो काढून दाखवला...
"ओ! शी इज व्हेरी प्रिटी!! व्हॉट डज शी डू?" मी सर्व माहिती पुरवली...
"डज शी लव्ह यू?", काय पण येडपट प्रश्न? पण तो विचारणारं डोकं अमेरिकन होतं ना!!!
"ते तूच तिला विचार! पुढल्या सेमेस्टरला इथे येणारे ती"
"रियली? दॅट वुड बी ग्रेट!" अलीशिया अतिशय आनंदाने म्हणाली, "यु नो, आय वॉज व्हेरी वरीड! आय वॉन्ट अस टू बी द बेस्ट फ्रेंन्डस! आय डिडंट वॉन्ट टू लूज यू ओव्हर धिस! बट बिईंग द फ्रेंन्ड आय डिडंन्ट वॉन्ट टू हाईड धिस फ्रॉम यू आयदर! फ्रेंन्डशिप मस्ट बी बेस्ड ऑन ट्रुथ ऍन्ड ओपननेस!!"
"आय ऍग्री!!" मी सहमत झालो.

त्यानंतर आमची मस्त मैत्री जमली. असंख्य विषयांवर आम्ही गप्पा मारल्या, चर्चा केल्या, कधीकधी भांडलोही!! वादावादीत कधी ती जिंकायची तर कधी मी!! एकदा असंच ती रिपब्लिकन असल्याचा उल्लेख झाला. मी आश्चर्य व्यक्त केलं.
"का? मी गे आहे म्हणून मी ऑटोमॅटिकली डेमोक्रॅट असलीच पाहिजे असं तुला वाटतं का?", अलीशिया
"तसं नाही पण गे लोकांच्या हक्कांबद्दल डेमोक्रॅटसच पाठिंबा देत आहेत ना, म्हणून मला वाटलं", मी.
"लुक, आय सपोर्ट स्मॉल बिझिनेस, आय लाईक स्मॉल गव्हर्नमेंट! आय डोन्ट लाईक लेबर युनियन्स, आय डोन्ट लाईक हाय टॅक्सेस! आय वॉन्ट द युएसए टू बी अ रिच, स्ट्राँन्ग ऍन्ड मायटी नेशन!! माय होल लाईफ, माय होल पर्सनॅलिटी, डजन्ट हॅव टू रिव्हॉल्व्ह अराऊंड माय बीइंग गे ऑर लेस्बियन! दॅट इस जस्ट वन पार्ट ऑफ माय लाईफ विच फ्रॅन्कली इज नन ऑफ द सोसायटीज बिझिनेस!!"
"आय ऍग्री!" मलाही ते पटलं.

त्यानंतर ती मला निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जायची. ती, सेरा आणि मी गे बार मध्येसुद्धा जाऊन बसायचो. तिथे गेल्यागेल्याच अलीशिया डिक्लेअर करून टाकायची, "धिस इज माय फ्रेंन्ड! ही इज स्ट्रेट!" मग कोणीही माझ्याशी लगट वगैरे करत नसे. एका मित्राशी वागावं तसंच सर्वजण माझ्याशी अतिशय सभ्यपणे वागत असत. पुढेपुढे त्यांना माझी इतकी सवय झाली की कधी मी नसलो कि तेच अलीशियाला माझी खुशाली विचारत असत.
या मित्रमंडळींकडून मला या गे-लेस्बियन संबंधांबद्दल खूप माहिती मिळाली. माझे सर्व गैरसमज दूर झाले. दहा-वीस वर्षे सुरळीत चालू असलेल्या त्यांच्या रिलेशन्शिप्स पाहून माझा त्यांच्या उत्छ्रंखलतेबद्दलचा गैरसमज दूर झाला. केवळ लग्न करता न आल्यामुळे त्यातून निर्माण होणार्‍या भावनिक आणि व्यवहारिक अडचणी समजल्या. पुढे माझी प्रेयसी मला येऊन जॉईन झाल्यावर आम्ही चौघांनी गावात खूप धूडगूस घातला...

कॉलेजची दोन्-तीन वर्षे भुर्रकन उडून गेली.....

डिग्री मिळाल्यावर मी नोकरी निमित्त न्यूयॉर्कला मूव्ह झालो. अलीशिया तिच्या वडिलांबरोबर त्यांच्या बिझिनेसमध्ये काम करू लागली. सुरवातीला फोन, मग कधीतरी ग्रीटींग असे कॉन्टॅक्ट होते. नंतरच्या दहा-पंधरा वर्षात तेही कमीकमी होत गेले. गेले पाच वर्षे तर काहीच संपर्क नव्हता.....

आणि आज तिचा असा अकस्मात हक्काचा फोन! काय काम असेल बरं तिचं माझ्याकडे?

.........

.........

"वुई आर हियर, सर", ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो....

मनाचा वेग काय जलद असतो! काही मिनिटांतच मी इतका फिरून आलो होतो....

हॉटेलच्या पोर्चमध्ये कार उभी होती. मी कारमधून खाली उतरलो. ड्रायव्हरचे आभार मानून मी वळलो तोवर त्याने माझी बॅग रिसेप्शन काऊंटरपाशी उभ्या असलेल्या एका तरूणीच्या हातात दिली आणि काही शीघ्र संभाषणही केलं. बहुदा मी कोण, काय, वगैरे सांगितलं असावं...

"वेलकम डॉ. ***! प्लीज बी सीटॅड हियर इन द फोरिये! मदाम विल बी हिअर इन अ फ्यू मिनिटस!!" इतक्या वर्षांमध्ये माझा जसा डॉक्टर झाला तशी अलीशियाची मदाम झाली होती....
"हाऊ वॉज द फ्लाईट?"
"व्हेरी कंफर्टेबल!" ती समजून उमजून हसली. कदाचित तिनंच ती चार्टर फ्लाईट बुक केली असेल...
"वुड यू लाईक समथिंग टू ड्रिंक व्हाईल यू वेट? अ ग्लास ऑफ वाईन परहॅप्स!!!"
"नो, जस्ट वॉटर वुड बी फाईन!!" मघाची प्लेनमधली शॅम्पेन अजून डोक्यात होती....

तिने दिलेल्या ग्लासातील पाणी हळूहळू सिप करत मी हातपाय ताणून बसलो होतो. इतक्यात,

"हे बडी! सो यू आर हियर ऍट लास्ट!!!" मागून हाक आली....

तोच चिरपरिचित आवाज.....

आणि तेच खळखळून हसणं.....

(क्रमशः)

अलीशिया भाग-२

(पूर्वसूत्रः "ड्राईव्ह टू सांता बार्बारा एअरपोर्ट. गो टू द युनायटेड एअरलाईन्स काउंटर्स! देअर विल बी अ पर्सन वेटींग फॉर यू", इतकीच माहिती! तिने दिलेला तो कागद हातात धरून मी सांता बार्बारा एअरपोर्टच्या दिशेने ड्राईव्ह करायला सुरवात केली.....)

सांता बार्बराचा एअरपोर्ट अगदीच लहान आहे. जवळपास प्रायव्हेट एअरपोर्ट म्हणावा असा!! तिथून युनायटेड एअरलाईन्ससारख्या मोठ्या एअरलाईनच्या फ्लाईटस आहेत हेच माझ्यासाठी नवीन होतं. पण असेल बाबा, आपल्याला सगळंच कुठं माहिती असतं? याच भावनेतून मी तिथे ड्राईव्ह करत होतो. अलीशियाने माझ्यासाठी युनायटेडवर फ्लाईट बुक केलेली दिसतेय! इतक्या थोड्या वेळात तसं करणं इंप्रेसिव्ह जरूर होतं पण अलीशियासाठी ते काहीच कठीण नव्हतं. आपल्या त्रिभुवनदास भीमजीला एखाद्या बागेजवळ मिळणारे चणेफुटाणे खरेदी करणं जितकं सोपं (किंवा कठीण!) असावं तितकंच!!!!

तासाभरात मी एअरपोर्टला पोहोचलो. सांगितल्याप्रमाणे सरळ युनायटेड एअरलाईन्सच्या चेक-इन काऊंटरपाशी गेलो. तर तिथे खरंच माझ्या आडनांवाची पाटी घेऊन एक महिला उभी होती.....

"हलो..." मी तिला विश केलं...
"डॉ. ***?" तिनं माझं आडनांव विचारून खात्री करून घेतली....
"येस! सो ऍम आय बुक्ड ऑन द युनायटेड?", मी.
"नो सर! ऑफकोर्स नॉट!! विल यु प्लिज फॉलो मी, सर?"

मी चुपचाप तिच्या पाठोपाठ निघालो. युनायटेडचे सगळे काऊंटर्स पार करुन ती एका दरवाजाशी आली. मी तिच्या पाठोपाठ येतो आहे याची खात्री करून घेउन तिने तो दरवाजा उघडला आणि मला पाठोपाठ येण्याची खूण केली. मी तिच्या पाठोपाठ त्या दरवाजातुन बाहेर गेलो....

आता आम्ही एअरपोर्ट् टर्मिनलच्या बाहेर विमानं जिथे उभी असतांत तिथे उभे होतो. ती सगळ्या विमानांतून, बॅगेज नेणार्‍या गाड्यांतुन, आणि विमानांना लावायच्या टग्जमधून सफाईने वाट काढत चालत होती....

थोडं अंतर चालुन गेल्यावर तिने समोर बोट दाखवलं....
तिथे एक छोटंसं जेट विमान उभं होतं. आत दोन पायलट बसलेले होते, विमानाचे पंखे सुरू होते.....
त्या बाईने खूण करताच विमानाचा दरवाजा उघडला आणि एक छोटीशी शिडी पुढे आली....

"हॅव अ हॅपी फ्लाईट सर!" मला त्या शिडीकडे निर्देशित करत ती महिला म्हणाली...

अरे बापरे! चार्टर्ड फ्लाईट? पण आता मला माघार घेणं शक्यच नव्हतं. 'आलिया भोगासी असावे सादर' असे मनात म्हणतच मी त्या शिडीवरून वर चढलो.....

"वेलकम अबोर्ड, सर!!", एका सोनेरी केसांच्या अतिशय आकर्षक मुलीने माझं स्वागत केलं. माझ्या हातातली बॅग घेतली आणि मला एका आरामखुर्चीवर (रिक्लायनर) बसवलं. मी बसताक्षणीच त्या खुर्चीत बुडालो.....
"व्हॉट वुड यू लाईक टू हॅव सर? पेरिये शॅम्पेन, कॉफी, पेलोग्रीनो?"
"सम शॅम्पेन प्लीज!"
'गुड चॉईस! इट इज सो हॉट टुडे!!" ती हसली अणि ड्रिंक आणायला निघून गेली.....

तेंव्हाच विमानाची इंजिने सुरू झाल्याचा आवाज मी ऐकला. खिडकीतून बाहेर पाहिलं तर विमान रनवेच्या दिशेने निघालंही होतं....
आपले सहप्रवासी कोण आहेत हे पहायला मी पॅसेंजर केबिनमध्ये नजर फिरवली. कोणीच नव्हतं, बाकीचे सर्व रिक्लायनर्स रिकामे होते.....

आता मात्र मला हे सर्व जरा विचित्र वाटू लागलं होतं. तेव्हढ्यात ती एअर होस्टेस चिल्ड शॅम्पेनने भरलेला ग्लास घेउन आली....

"व्हेअर आर द अदर पॅसेंजर्स?"
"अदर पॅसेंजर्स? नो, वुई डोन्ट हॅव एनीवन एल्स टुडे सर! यु आर द ओन्ली वन!!!"
"व्हेअर आर वुई गोईंग?" आता विमानाने आकाशात टेक-ऑफ घेतला होता....
"टू सान फ्रानसिस्को सर!! ऍक्चुअली टू ओकलंड सर!!! युवर होटेल इज क्लोजर फ्रॉम देअर!!"
"ओ गॉड! थँक्स!!!"

"येस सर! वुई वोन्ट बी किडनॅपिंग यू टु बैरूट ऑर एनिथिंग!!!" ती कन्यका खळखळून हसत म्हणाली....
तिच्या विनोदबुद्धीला दाद देत मी शॅम्पेन ओठांना लावली....

मस्तच होती!!!!
आणि... शॅम्पेनही छान होती!!

आजवर मी असंख्यवेळा विमानातून प्रवास केला होता. कंपनीच्या खर्चाने का होईना पण अनेक वेळा विमानाच्या फर्स्टक्लास मधूनही गेलो होतो, विशेषतः इंटरनॅशनल फ्लाईट्स! पण चार्टर फ्लाईटमधून प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यातही आख्ख्या विमानात मी एकच प्रवासी!!!! मुंबईच्या कनिष्ट मध्यमवर्गात वाढलेल्या आणि एष्टी-लोकलमधून प्रवास केलेल्या माझ्यासारख्या मुलासाठी हा अनुभव म्हणजे अगदी टू मच होता!! त्यात ती शॅम्पेन आणि त्या सुवर्णकेशी मुलीचं मधाळ हास्य.......

राहिलेला रिपोर्ट वाचून पूर्ण करावा म्हणून त्या होस्टेसकडे माझी बॅग मागण्याचा विचार केला. पण नंतर ठरवलं की जाऊदे! मरूदे तिच्यायला!!! रिपोर्ट काय घरी परत जातांनाही वाचता येईल की! इथे हा एक अनोखा अनुभव मिळतोय तर त्याचा पूर्ण आस्वाद घ्यावा!!! होस्टेसला ग्लास रीफिल करायला सांगून मी त्या कोचात हात पाय ताणले, डोळे मिटुन घेतले.......

डोळ्यासमोर भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा भराभर सरकू लागला.....

अलीशिया माझी कॉलेजमधली मैत्रिण!!! आमची ओळख आणि मैत्री होण्याची कारणंही विचित्रच होती.....

मी नुकताच मुंबईतून माझ्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झालेलो होतो. आमच्या इंटरनॅशनल स्टुडंट्स हाऊसमध्ये उतरलो होतो. तिथे नवीन आलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना एक महिनाभर रहायची मुभा होती. एक महिन्यानंतर मात्र एकतर हॉस्टेलवर रहायला जायला लागायचं किंवा गावात एखादं अपार्ट्मेंट भाड्याने घ्यायला लागायचं आणि नव्यानं येणार्‍या विदेशी मुलांसाठी जागा खाली करून द्यायची असा नियम होता...

मी इथे आल्यावर इथल्या मेसमध्ये अमेरिकन फूड चाखलं होतं त्यामुळे हॉस्टेलवर रहायचा प्रश्नच नव्हता. दोन महिन्यातच उपासमारीने मेलो असतो. चांगली धडधाकट माणसं न्याहारीला दूध-लाह्या आणि जेवणाला उकडलेला बटाटा खातात हे मला आजवर माहितच नव्हतं. आमच्या मुंबईत जर माणूस सतत आजारी असेल आणि दुसरं काही पचत नसेल तरच त्याला असं अन्न द्यायची पद्धत होती. आणि त्यातही पंचाईत म्हणजे हॉस्टेलवर स्वतःचं अन्न शिजवायला परवानगी नव्हती...

शेवटी मी मला परवडणारं एक स्टुडियो अपार्ट्मेंट भाड्याने घेतलं. स्टुडियो म्हणजे एकच खोली! हॉल, किचन, बेडरूम, संडास व बाथरूम सर्व त्या एकाच खोलीत बसवण्याची किमया त्या आर्किटेक्टने साधलेली होती!!! चावी घेऊन आत शिरलो. अपार्टमेंट अतिशय स्वच्छ होतं. पण लाईट लावला तर लाईट लागेना!!! मग असं कळलं की वीज कंपनीला आपण तिथे रहायला आल्याचं कळवून डिपॉझिट भरावं लागतं मग ते तिथे बसून इलेक्ट्रिसिटी चालू करतात. मी रीतसर फोन केला. पण मी भारतातून नवीन आलेला असल्याने फोनवरून डिपॉझिट भरायला माझ्याकडे क्रेडिट कार्ड नव्हतं, आयडी साठी अमेरिकन ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं! होतं ते युनिव्हर्सिटीचं आयडी कार्ड आणि कॅश!!! मला असं सांगण्यात आलं की अशा परिस्थीतीत मी त्या शहरातल्या वीजमंडळाच्या (एमेसीबीच्या म्हणणार होतो, पण यांची वीज साली चोवीस तास अखंडित चालू रहायची, तिच्यामारी!!!!) मुख्य ऑफिसात जाऊन पैसे भरावेत. मी ठीक आहे म्हटलं. आता क्लासची वेळ झाली होती म्हणून नंतर दुपारी तिथे जाण्याचा विचार केला आणि क्लासला गेलो....

त्या दिवशी क्लासमध्ये आम्हाला एक नवीन ग्रुप प्रोजेक्ट दिला गेला. माझ्या ग्रुपमध्ये तीन मुली आणि आम्ही दोघं मुलं होतो. क्लास संपल्यानंतर आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या आणि प्रोजेक्टवर काम कसं करायचं ते ठरवू लागलो. तेंव्हा कोणीतरी बूट काढला की आपण क्लासेस संपल्यानंतर दुपारी एकत्र बसून प्रोजेक्टची रूपरेखा ठरवावी. मी लगेच सांगितलं की मला आज दुपारी शक्य नाही कारण मला वीजमंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन डिपॉझिट भरायचं आहे....

"व्हाय डोन्च्यू जस्ट कॉल देम?", एकीने सुचवलं
"आय डिड! बट सिन्स आय डोन्ट हॅव्ह अ क्रेडिट कार्ड आय नीड टू गो देअर इन पर्सन!! तिथे कुठली बस जाते तुम्हाला कुणाला माहितीये का?"
"बस? व्हाय बस? टेक माय कार" त्या मुलाने कार ऑफर केली
"आय कान्ट! माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसनही नाहिये"

आता त्या ग्रुपमधल्या एका मुलीने माझ्याकडे जणू पहिल्यांदाच पाहिल्यासारखं निरखून पाहिलं....
पावसातल्या भिजक्या मा़ंजराच्या पिल्लाकडे पहावं तसं.....

"फरगेट द बस!", ती पूर्ण भूतदयेने म्हणाली, " मी तुला माझ्या गाडीतून घेऊन जाईन. तुला माहितीये का तिथे कसं जायचं ते?"
"मला वाटलं की ते सगळ्यांना माहिती असेल. ते वीज मंडळाचं हेड्-ऑफिस आहे असं मला फोनवर म्हणाले!" आयला, आपल्या गावातलं एमेसीबीचं गावातलं हेडऑफिस माहिती नाही या लोकांना? माझ्या मनातला विचार...
"हे बघ, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी इलेक्टॄसिटीच्या कोणत्याच ऑफिसात गेलेली नाही. त्यांचा फोन नंबर आहे तुझ्याकडे?"

मी नंबर दिला. तिने फोनपाशी जाऊन त्यांना कॉल केला आणि पत्ता विचारला (खरंतर तिने ड्रायव्हिंग डायरेक्शन्स विचारल्या होत्या हे मला नंतर उमजलं).

"काय नांव तुझं?" ती. मी परत एकदा माझं नांव सांगितलं. म्हणजे जेंव्हा पहिल्यांदा सांगितलं तेंव्हा तिने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं तर....
"आय ऍम अलीशिया, फॉलो मी" असं म्हणून ती माझ्याकडे पाठ फिरवून ताड्ताड् चालत सुटली. अणि मी आपला धडपडत तिच्यामागे....

जवळ जवळ पावणे सहा फूट उंची! कॉकेशियन तांबडा-गोरा वर्ण!! सुई टोचली तर भळभळ रक्त वाहू लागेल अशी नितळ त्वचा!! माधुरी दिक्षितसारखे खांद्यापर्यंत आलेले पण सोनेरी केस! गर्द हिरवे डोळे, श्रीदेवीला नगीनामध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस घालूनही ही शेड साधता आली नव्हती! अंगात काळी पँन्ट आणि एक अतितलम पांढरा शर्ट! कानात लखलखीत हिर्‍याची कर्णभूषणे, (हो हिरेच असावेत ते! पण खरे हिरे असतील तर ते इतके मोठे कसे असतील?)! आणि अतिशय बांधेसूद, टंच शरीरयष्टी!!! सर्व काही आखीव, रेखीव, आणि जिथल्या तिथं!!! जणू एखाद्या ग्रीक देवतेच्या पुतळ्यालाच आधुनिक पोषाख चढवला असावा ना, तसं....

तिच्यामागून तिला निरखत चालत रहाणंही अतिशय आनंददायक होतं!!!

तिच्या गाडीपाशी आल्यावर तिने डिकी उघडून तिची आणि माझी पुस्तकांची बॅग आत ठेवली आणि मला सीटवर बसायचा निर्देश करून ती स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली....

अर्ध्या तासात आम्ही वीजमंडळाच्या कार्यालयात पोचलो. मी तिथे गर्दी अपेक्षित केली होती. पण माझ्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध तिथे कुणीच ग्राहक नव्हते. क्रेडिट कार्ड नसल्याने तिथे प्रत्यक्ष येऊन पैशाचा भरणा करावा लागणारे माझ्याशिवाय आणखी दुर्दैवी जीव गावात अन्य नसावेत. माझं काम उरकून आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि वाटेतच पाऊस सुरू झाला...

"शिट! नाउ वुई आर गोईंग टू गेट वेट!!!", अलीशिया
"व्हाय? वुइ आर इन द कार"
"नॉट हियर डमी! हाऊ आर गोईंग टू वॉक फ्रॉम द पार्किंग लॉट टू द बिल्डिंग?"
"यू हॅव ऍन अम्ब्रेला इन युवर डिकी"

"व्हॉऽऽऽऽट?", करकच्चून आवाज करत कार थांबली, "व्हॉट द हेल आर यु टॉकिंग अबाऊट?"
"आय सॉ ऍन अम्ब्रेला इन युवर डिकी"
"फर्स्ट ऑफ ऑल, आय डोन्ट हॅव अ डिकी." अलीशिया रागाने लालबुंद होऊन ओरडली, "ऍन्ड सेकंडली, हाऊ कॅन वन हाईड ऍन अम्ब्रेला इन अ डिकी?"

ती का चिडली तेच मला समजेना...

"आय सॉ द अम्ब्रेला व्हेन यू पुट अवर बॅग्ज इन द डिकी अर्लियर", मी.
"अवर बॅग्ज इन द....! ओ, यु मीन द ट्रंक?"
"येस!"
"व्हाय डू यू कॉल इट अ डिकी? ऍन्ड देन व्हॉट डू यू कॉल दॅट?" तिने गाडीच्या पुढे बोट करून विचारलं...
"अ बॉनेट!"
"अ बॉनेट?"
"येस, एव्हरी कार हॅज अ बॉनेट ऍन्ड अ डिकी!!", मी.

अलीशिया एकदम खोखो हसत सुटली. तिच्या गडगडाटी हसण्याने कारची केबिन भरून गेली. बराच वेळ गेला तरी तिचं हसणं काही थांबेना. माझ्याकडे बघत हसू असह्य झाल्यामुळे ती खोकत खोकत हसत होती. काही वेळाने डोळ्यातून वहाणारं पाणी पुसत ती म्हणाली,

"हियर इन अमेरिका, द फ्रंट ऑफ द कार इज कॉल्ड द हूड ऍन्ड द स्टोरेज स्पेस इन द बॅक इज कॉल्ड द ट्रंक!!!"
"आय सी!!"
"हियर वुई कॉल दॅट अ डिकी", माझ्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये निर्भयपणे बोट दाखवून निर्देश करत ती म्हणाली, "ऍन्ड धिस वी कॉल अ व्हजायना", तसाच स्वतःकडे निर्देश करत ती म्हणाली....

"ओ माय गॉड!" धरती दुभंगून मला आपल्या पोटात घेईल तर बरं असं मला झालं....
"आय ऍम सॉरी अलीशिया, आय डिडंन्ट नो!!", मी माफी मागितली. ती परत हसत सुटली...

"सो रिमेंबर, इन धिस कंट्री इफ यू आस्क वुइमेन अबाऊट देअर डिकी यू आर इन्सल्टींग देम ऍन्ड इफ यू शो इन्टरेस्ट इन द डिकी विथ मेन देन यू आर गिव्हिंग देम अ व्हेरी डिफरंन्ट इंप्रेशन अबाऊट युवरसेल्फ!!"

"आय विल रिमेंबर धिस!!" माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
अमेरिकेमधल्या माझ्या शिक्षणाला आता खर्‍या अर्थाने सुरवात झाली होती....

आम्ही परत डिपार्ट्मेंटला आलो. बाकीचे तिघे अजून तिथेच बसून प्रोजेक्टची चर्चा करत होते.
"सो यू आर बॅक," त्या दोन मुलींमधली एक म्हणाली, " डिड यू गेट डीलेड बाय द रेन?"
"नो!", अलीशिया पुन्हा एकदा खळखळून हसत म्हणाली, "वुई गॉट डीलेड बिकॉज वुई वेअर बिझी इन्स्पेक्टिंग हिज डिकी!!!!!!"

त्या तिघे बिचारे काही न कळून एकदा माझ्या चेहर्‍याकडे आणि एकदा माझ्या "तिथे" बघत राहिले....
"आय लाईक यू", माझ्या पाठीवर जोरदार थाप मारत अलीशिया उद्गारली, "वुई आर गोईंग टू बी व्हेरी गुड फ्रेंन्डस!!!"

तिची बत्तिशी अगदी पुरेपूर खरी ठरली होती.....

.....
.....

"फासन् युवर सीट्बेल्ट सर, वुई आर लॅन्डिंग!!"

मी डोळे उघडले. मघाची ती सुवर्णकेशी कन्यका समोर उभी होती. थोड्याच वेळात विमान लॅन्ड झालं. त्या होस्टेसचा निरोप घेऊन मी ओकलंडच्या टर्मिनलमध्ये आलो. तिथे परत माझ्या नांवाची पाटी घेतलेला एक माणूस उभा! मला अलीशियाच्या होटेलवर न्यायला!! त्याच्याबरोबर त्याच्या कारमध्ये जाऊन बसलो....

"वुई हॅव क्वाईट अ ट्रॅफिक टुडे सर! इट मे टेक अ व्हाईल!!" तो अपराधी स्वरात म्हणाला.
"ओके, नो प्रॉब्लेम!" असं म्हणून मागच्या सीटवर रीलॅक्स होत मी पुन्हा डोळे मिटले....

भूतकाळाचा चित्रपट जणू इंटरव्हलनंतर पुन्हा सुरू झाला....

(क्रमशः)